Mumbai Corona Update : मुंबईत कोरोनाचा संसर्ग वाढतोय, पुन्हा निर्बंधांच्या दिशेनं वाटचाल?
Mumbai Corona : मुंबईतील वाढती कोरोनाची संख्या लक्षात घेता महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सच्या सदस्यांनी पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सिनेमागृह, मॉल, गर्दीच्या ठिकाणी मास्क अनिवार्य करण्याचा सल्ला दिला आहे.
मुंबई : मुंबईमध्ये पुन्हा एकदा कोरोना महामारीने (Mumbai Corona) हातपाय पसरण्यास सुरुवात केल्याचं चित्र दिसत आहे. गेल्या आठवड्यापासून दैनंदिन रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचं आकडेवारीतून समोर आलं आहे. त्यामुळे पुन्हा चिंत वाढली आहे. मुंबईतील वाढती कोरोनाची संख्या लक्षात घेता महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सच्या (Maharashtra Covid Task Force) सदस्यांनी पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (CM Uddhav Thackeray) सिनेमागृह, मॉल, गर्दीच्या ठिकाणी मास्क अनिवार्य करण्याचा सल्ला दिला आहे.
मागील आठवड्याभरात झपाट्याने वाढणारी कोरोना रुग्णांची आकडेवारी
- 20 एप्रिल - 98
- 21 एप्रिल - 91
- 22 एप्रिल - 68
- 23 एप्रिल - 72
- 24 एप्रिल - 73
- 25 एप्रिल - 45
- 26 एप्रिल - 102
मुंबईत मंगळवारी कोरोनाच्या नव्या 102 रुग्णांची नोंद झाली. य 102 रुग्णांपैकी 97 टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणेआढळली नाही. मुंबईत कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत असली तरी कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. नव्या वाढत्या कोरोना रुग्णांबरोबर मुंबईतील एकून कोरोनाबाधितांचा आकडा 10,58,511 वर गेला आहे. तर मृतांची संख्या 19,562 आहे. गेल्या 24 तासात मुंबईत 7,240 चाचण्या करण्यात आल्य आहे. मंगळवारी कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट 1.4 टक्क्यांवर गेल आहे. या महिन्यात दुसऱ्यांदा पॉझिटिव्हिटी रेट हा 1 टक्क्याच्या पुढे गेला आहे. या अगोदर 20 एप्रिलला मुंबई शहराचा पॉझिटिव्हिटी रेट 1.03% होते.
मुंबईत 27 फेब्रुवारीनंतरची दिवसभरातील ही सर्वाधिक रुग्णवाढ आहे. कोरोनाची ही स्थिती लक्षात घेता केंद्र सरकारने आधीच राज्यांना सतर्क राहण्याच्या आणि आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. देशात जून अखेरपर्यंत कोरोनाची चौथी लाट येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. त्यामुळे आजची बैठक महत्वाची आहे.
संबधित बातम्या :