(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Corona Update : रविवारच्या तुलनेत मुंबईतील रुग्णसंख्येत घट; 235 नवे कोरोनाबाधित
Mumbai Corona Update : मुंबई पालिकेने दिलेल्या माहितीनुसारप 235 नव्या बाधितांसह 431 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
Mumbai Coronavirus Cases : मुंबईतील कोरोना (Corona) रुग्णसंख्येत रविवारच्या तुलनेत आज किंचित घट दिसून आली आहे. मुंबईतील रुग्णसंख्येत आज रविवारच्या तुलनेत किंचित घट दिसून आली. रविवारपेक्षा 164 कमी रुग्ण आज आढळले आहेत. आज 235 नवे कोरोनाबाधित समोर आले असून रविवारी ही संख्या 399 इतकी होती. रुग्णसंख्या मागील काही दिवसांत काही प्रमाणात कमी होत असली तरी अजूनही कोरोनाबाधित आढळत असल्याने पालिका प्रशासनाची डोकेदुखी कायम असून नागरिकांनाही काळजी घेणं अनिवार्य झालं आहे.
मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत सोमवारी 235 नवे कोरोनाबाधित आढळले असून 431 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट 98 टक्क्यांवर पोहोचला आहे. रुग्ण दुपटीचा दर 1446 दिवसांवर पोहोचला आहे.
राज्यात 1189 नवे कोरोनाबाधित
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात मागील 24 तासांत 1189 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर दोन बाधितांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 1529 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आजपर्यंत 78,39,208 करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.93 टक्के एवढे झाले आहे. राज्यात दोन कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूमुळे राज्यातील मृत्यूदर 1.84 टक्के एवढा आहे. राज्यात सध्या 18027 सक्रिय रुग्ण आहेत. कोरोनाच्या नव्या रूग्णांच्या संख्येत घट होत असल्यामुळे सक्रिय रूग्णांची संख्या देखील कमी होत आहे. देशातील बाधितांचा विचार करता, देशात गेल्या 24 तासांत नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. 16 हजार 678 नवीन कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून 26 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
हे ही वाचा-