एक्स्प्लोर

Dahi handi: जखमी गोविंदा प्रथमेश सावंतची मृत्यूशी झुंज अपयशी; हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Dahi Handi 2022: गोविंदाच्या थरावरून कोसळल्याने गंभीर जखमी झालेल्या प्रथमेश सावंतची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. तो 20 वर्षांचा होता.

Dahi Handi 2022: दहिहंडी खेळताना (Dahi Handi 2022) थरावरून कोसळल्याने गंभीर जखमी झालेल्या प्रथमेश सावंत (Prathmesh Sawant) या तरुणाचे आज मुंबईतील केईएम रुग्णालयात (KEM Hospital) निधन झाले. प्रथमेशवर मागील महिनाभरापासून उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्याला न्युमोनिया झाला. त्याच दरम्यान आज सकाळी त्याला कार्डिएक अरेस्ट आल्याने त्याचा मृत्यू झाला. प्रथमेश सावंतचे वय 20 वर्ष होते. त्याच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे. याआधी थरावरून कोसळलेल्या संदेश दळवी या तरुणाचे उपचारादरम्यान निधन झाले होते. 

यंदाच्या वर्षी कोरोना महासाथीचा जोर ओसरल्याने दहीहंडीवर जल्लोषात साजरी करण्यात आली. सरकारनेदेखील यंदा दहीहंडीवर निर्बंधमुक्त असणार असल्याची घोषणा केली होती. प्रथमेश हा आपल्या स्थानिक मंडळाच्या गोविंदा पथकात सहभागी झाला होता. दहीहंडी फोडताना गोविंदाच्या थरावरून कोसळल्याने प्रथमेशला गंभीर दुखापत झाली होती. त्याच्या पाठिचा कणा फ्रॅक्चर झाला होता. त्यामुळे शरीराची हालचाल आणि संवेदना बंद झाली होती. प्रथमेशवर केईएम रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. 

यंदाच्या वर्षी मुंबई-ठाण्यात सुमारे 250 च्या आसपास गोविंदा जखमी झाले होते. त्यातील 197 गोविंदाना किरकोळ दुखापत झाली होती. त्यांच्यावर उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली होती.  

कुटुंबावर काळाचा आघात

प्रथमेश सावंत याच्या निधनाने काळाने कुटुंबावर घाला घातला आहे. प्रथमेश लहान असताना त्याच्या आईचे कॅन्सरने निधन झाले होते. त्यानंतर त्याचे वडील आणि बहिणीचे एका आजाराने निधन झाले. आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या प्रथमेशचा सांभाळ चुलते करत होते. आयटीआयचे शिक्षण घेतानाच डिलिव्हरी बॉय म्हणून घरोघरी खाद्यपदार्थ पोहोचविण्याचे कामही तो करत होता. प्रथमेशच्या उपचारासाठी मोठा खर्च आला होता. त्यासाठी काहींनी मदत केली होती. मुख्यमंत्री कार्यालयाने त्याच्या उपचारासाठी 5 लाखांची मदत केली होती.   

संदेश दळवी याचे निधन 

दहिहंडी उत्सवा दरम्यान थरावरून कोसळल्याने विलेपार्ले येथील गोविंदा पथकातील संदेश दळवी या तरुणाचे निधन झाले होते. त्याच्यावर नानावटी रुग्णालयात दोन दिवस उपचार सुरू होते. विलेपार्ले येथील गोविंदा कार्यक्रमात संदेश सातव्या थरावरून कोसळला होता. त्याच्या मानेला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याला उपचारासाठी नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारदरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी आयोजकांविरोधात गुन्हा दाखल केला होता.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

Dahi Handi Festival : दहिहंडीबाबत कोर्टाच्या नियमांचे काय झाले? गोविंदाच्या मृत्यूनंतर सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Washim Assembly Election : भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 November 2024Vidhan Sabha SuperFast | विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवरImtiyaz Jaleel vs Atul Save : अतुल सावे की इम्तियाज जलील? पूर्व संभाजीनगरमध्ये कुणाची हवा?Muddyach Bola  | परळीकरांची कुणाला साथ? धनुभाऊच्या बालेकिल्ल्यातून मुद्याचं बोला!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Washim Assembly Election : भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
CJI DY Chandrachud : तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
Pune Assembly Election : पुणे जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण आपापसात भिडणार? 21 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट! जाणून घ्या उमेदवारांची नावं
पुणे जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण आपापसात भिडणार? 21 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट! जाणून घ्या उमेदवारांची नावं
Sambhajiraje Chhatrapati : शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब; संभाजीराजेंनी अमित शाहांचा शिराळ्यातील दावा खोडून काढला
शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब; संभाजीराजेंनी अमित शाहांचा शिराळ्यातील दावा खोडून काढला
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले
Embed widget