![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
SSC, HSC Results Dates | दहावी, बारावीचा निकाल लवकरच जाहीर होणार : शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावीचा निकाल लवकरचं जाहीर होणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली.
![SSC, HSC Results Dates | दहावी, बारावीचा निकाल लवकरच जाहीर होणार : शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड Maharashtra 10th, 12th Result 2020 Date Heres when to expect MSBSHE HSC result SSC, HSC Results Dates | दहावी, बारावीचा निकाल लवकरच जाहीर होणार : शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/07/14032414/resukts.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : आयसीएसई (ICSE) आणि आयएससी (ISC) बोर्डानंतर आज केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड म्हणजेच CBSE सीबीएसईच्या बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या निकालाचे वेध आता सर्वांनाच लागले आहेत. हा निकालही लवकचं लागणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
बारावीचा निकाल 15 ते 20 जुलै तर दहावीचा निकाल 31 जुलैपर्यंत लागणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितले. त्यांनी एबीपी माझाशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. लॉकडाऊनमुळे दहावीचा एक पेपर रद्द झाल्याने पेपर तपासणीची प्रक्रियादेखील लांबली होती. त्यामुळे यंदा दहावी आणि बारावी दोन्ही वर्गाचे निकाल लांबले आहेत. दरम्यान, आयसीएसई (ICSE) आणि सीबीएससी (CBSE) बोर्डाच्या दहावी, बारावीचा निकाल देखील लागला आहे. त्यामुळे महाराष्ट्र बोर्डाचा निकाल कधी असा प्रश्न उपस्थित केला जात होता. याचं उत्तर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलंय. त्यामुळे या महिन्याच्या अखेरपर्यंत दोन्ही वर्गाचे निकाल लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यंदा सीबीएसईचा निकाल 5.38 टक्के जास्त 2019 च्या तुलनेत यावर्षीचा निकाल 5.38 टक्के जास्त आहे. गेल्या वर्षी 83.40 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. यावर्षी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी 88.78 टक्के आहेत.
सीबीएसईच्या पुणे विभागात उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी 90.24 टक्के आहे. देशात सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचं प्रमाण केरळच्या तिरुवनंतपुरम विभागात आहे, तिथे 97.67 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्याखालोखाल बेंगळुरू विभागाचा नंबर आहे, बेंगळुरू विभागात 97.05 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
सर्वात कमी विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचं प्रमाण पाटणा विभागात आहे, तिथे फक्त 74.57 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सीबीएसई अभ्यासक्रमानुसार, 13109 शाळांमधील विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, त्यासाठी 4984 परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली होती.
SSC HSC Results | दहावीचा निकाल 15-20 जुलै दरम्यान तर, बारावीचा निकाल 31 जुलैपर्यंत लागणार
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)