एक्स्प्लोर

भिवंडीत अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कंटेनरमधून 70 कामगारांना यूपीमध्ये नेत असल्याचे उघड

अत्यावश्यक सेवा असे फलक लावलेल्या कंटेनरमधून 70 कामगारांना कोंबून भिवंडीतून उत्तर प्रदेशमध्ये घेऊन जात असताना पोलिसांनी पकडले.

भिवंडी : कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊनची घोषणा करत सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आली. मात्र अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांची सुरु आहे. परंतु या अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कंटेनरमधून 70 कामगारांना कोंबून भिवंडीतून उत्तर प्रदेशमध्ये नेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

भिवंडी शहरातील अंजुर फाटा परिसरात अत्यावश्यक सेवा असे फलक लावलेल्या कंटेनरमधून 70 कामगारांना कोंबून भिवंडीतून उत्तर प्रदेशमध्ये घेऊन जात असताना नारपोली पोलिसांनी पकडले. तसेच या प्रत्येक कामगारांकडून कंटेनर चालकाने उत्तर प्रदेशात सोडण्यासाठी साडेतीन ते चार हजार रुपये घेतले असल्याचे माहिती मिळाली आहे

लॉकडाऊनमुळे अडकलेले नागरिक घरी परतणार; जिल्हाधिकाऱ्यांकडून स्थलांतराची कार्यवाही

Lockdown | देशभरात अडकलेल्या लोकांचा घरी जाण्याचा मार्ग मोकळा; चार मे पासून अंमलबजावणी

उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार या राज्यात कंटेनर, ट्रकमधून लपूनछपून परराज्यातील मजूर जात असताना त्यांना पकडण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर उघडकीस आल्या आहेत. परंतु अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कंटेनरमधून देखील माणसांची वाहतूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सध्या नारपोली पोलिसांनी या कंटेनरसह 70 कामगारांना ताब्यात घेतले आहे. तसेच हा कंटेनरही पोलिसांनी जप्त केला असून पुढील तपास सुरु आहे. दरम्यान कामगारांना त्यांच्या राहत्या ठिकाणी पोहोचवण्याचा विचार सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

देशभरात अडकलेल्यांचा घरी परतण्याचा मार्ग मोकळा लॉकडाऊनमुळे देशभरात अनेक ठिकाणी लोक अडकलेले आहेत. त्यामध्ये मजूर, विद्यार्थी, यात्रेकरु आणि पर्यटकांचा समावेश आहे. या सर्वांचा घरी परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण, गृह मंत्रालयाने ठिकठिकाणी अडकलेल्या लोकांना घरी परतण्यासाठी नवीन गाईडलाईन जारी केल्या आहेत. अडकलेले म. विद्यार्थी, यात्रेकरु आणि अन्य यांच्या आंतरराज्यीय प्रवासाची परवानगीची अंमलबजावणी 4 मे पासून होणार आहे नव्या गाईडलाइन्सनुसार सर्वच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी नोडल अधिकारी नियुक्त करुन अकडलेल्या व्यक्तींना परत पाठवण्यासाठी तसेच मूळ ठिकाणी परत आणण्यासाठी एक एसओपीची नियुक्ती करावी लागणार आहे.

Anil Deshmukh | लॉकडाऊनमुळे अडकलेल्यांना परतण्यासाठी काय नियम आहेत? गृहमंत्र्यांची माहिती

महत्त्वाच्या बातम्या

दुष्काळ जाहीर करावा ही गरज, तो आपोआपच होईल; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती, म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी
दुष्काळ जाहीर करावा ही गरज, तो आपोआपच होईल; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती, म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2026 | गुरुवार 
Maharashtra Todays Breaking News Updates: मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित, मात्र आंदोलन सुरुच राहणार
Maharashtra Todays Breaking News Updates: मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित, मात्र आंदोलन सुरुच राहणार
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' टीममधील लेखकाचे अपघाती निधन; सचिन गोस्वामींची भावुक पोस्ट, टीमवर शोककळा
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' टीममधील लेखकाचे अपघाती निधन; सचिन गोस्वामींची भावुक पोस्ट, टीमवर शोककळा

व्हिडीओ

Manoj Jarange Beed UNCUT : मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित; सरकारचं शिष्टमंडळ पोहोचल्यानंतर काय घडलं?
Seema Pahuja Supervising Disha Salian Case : लक्ष तपासावर जबाबदारी लेडी सिंघमवर | Special Report ABP Majha
PM Modi’s schoolmate Asgar Ali gets relief in land dispute : मोदींशी मैत्री अखंड; परत मिळाला भूखंड | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Relaunching : मिस यू दादा... आता वहिनींचा वादा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगे सलाईनवर, तरी ठाम निर्णयावर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
N Chandrasekaran: अवघ्या एक महिन्यांपूर्वी तडकाफडकी राजीनामा दिलेल्या टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ पाच वर्षांनी वाढवला, टाटा ग्रुपमध्ये पहिल्यांदाच निर्णय
अवघ्या एक महिन्यांपूर्वी तडकाफडकी राजीनामा दिलेल्या टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ पाच वर्षांनी वाढवला, टाटा ग्रुपमध्ये पहिल्यांदाच निर्णय
दुष्काळ जाहीर करावा ही गरज, तो आपोआपच होईल; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती, म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी
दुष्काळ जाहीर करावा ही गरज, तो आपोआपच होईल; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती, म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी
संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वारा, वीजेचा कहर; दोन वेगवेगळ्या दुर्घटनेत 5 ठार, वीज पडून शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू
संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वारा, वीजेचा कहर; दोन वेगवेगळ्या दुर्घटनेत 5 ठार, वीज पडून शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू
पावसाअभावी शेतकऱ्यांवर भीषण परिस्थिती; सोयाबीनची तिरडी, अंत्ययात्रा निघाली, स्मशानभूमीत अंत्यसंस्कारही केले
पावसाअभावी शेतकऱ्यांवर भीषण परिस्थिती; सोयाबीनची तिरडी, अंत्ययात्रा निघाली, स्मशानभूमीत अंत्यसंस्कारही केले
Gokul Election: गोकुळला महायुतीच्या कारभाऱ्यांमध्येच जुंपली! हसन मुश्रीफांचा थेट खासदार धनंजय महाडिकांवर हल्लाबोल, म्हणाले, 'आमची बार्गेनिंग पॉवर कशी कमी करता येईल यासाठीच..'
गोकुळला महायुतीच्या कारभाऱ्यांमध्येच जुंपली! हसन मुश्रीफांचा थेट खासदार धनंजय महाडिकांवर हल्लाबोल, म्हणाले, 'आमची बार्गेनिंग पॉवर कशी कमी करता येईल यासाठीच..'
Sanjay Raut : संजय राऊत यांचं
संजय राऊत यांचं नवं पुस्तक लवकरच वाचकांच्या भेटीला,  "बोध कीर्तन" पुस्तकात नेमकं काय असणार? 
UP News: 'हो, त्यांना पाच मुले आहेत, तरी मी यांच्याशीच लग्न करेन', जावई अन् सासू एकमेकांवर झाले फिदा, पोलिसांसमोर म्हणाले, 'आम्ही सोबतच राहणार....'
'हो, त्यांना पाच मुले आहेत, तरी मी यांच्याशीच लग्न करेन', जावई अन् सासू एकमेकांवर झाले फिदा, पोलिसांसमोर म्हणाले, 'आम्ही सोबतच राहणार....'
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेवर आतापर्यंत सरकारकडून 78700 कोटी खर्च, आकडेवारी समोर, पात्र लाभार्थ्यांची संख्या नेमकी किती?
लाडकी बहीण योजनेवर आतापर्यंत सरकारकडून 78700 कोटी खर्च, आकडेवारी समोर, पात्र लाभार्थ्यांची संख्या नेमकी किती?
Embed widget