एक्स्प्लोर
Advertisement
लता मंगेशकर यांची अटलजींना कविता गायनातून श्रद्धांजली
दिल्लीतील स्मृतीस्थळावर वाजपेयींच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अटल बिहारी वाजपेयींची मानसकन्या नमिता भट्टाचार्य यांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.
मुंबई : भारताचे माजी पंतप्रधान आणि थोर कवी, उत्तम पत्रकार असं बहुआयामी व्यक्तीमत्व, कठोर, कणखर, प्रखर राष्ट्रवादी आणि हिंदुत्वाचा पुरस्कार करणारा नेता भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आज आपल्याला कायमचे सोडून गेले.. दिल्लीतील स्मृतीस्थळावर वाजपेयींच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
अटल बिहारी वाजपेयींची मानसकन्या नमिता भट्टाचार्य यांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.
अटलजींच्या अंत्यदर्शनासाठी लाखो लोक राजधानी दिल्लीत गेले होते. तर ज्यांना शक्य नाही अशा प्रत्येकाने आपापल्या शब्दांमध्ये अटलजींना श्रद्धांजली वाहिली. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनीही अटलजींच्या एका कवितेला आवाज देत ती त्यांना अर्पण केली.
‘मौत से ठन गई’ ही कविता लता मंगेशकर यांनी गायली आहे. अटलजींच्या कविता जेव्हा रेकॉर्ड केल्या, तेव्हा अल्बममध्ये ही कविता नव्हते. आज ही कविता रेकॉर्ड करुन अटलजींना अर्पण करत आहे, अशा शब्दात लता मंगेशकर यांनी श्रद्धांजली वाहिली.
या कवितेचा व्हिडीओ त्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.
मेरे दद्दा अटलजी एक साधुपुरुष थे.हिमालय जैसे ऊँचे थे और गंगा जैसे पवित्र थे। मैंने उनकी कुछ कविताएँ जब रेकॉर्ड की थी तब ये एक कविता अल्बम में नहीं थी। वो कविता मैं आज उनकी याद को अर्पण करती हूँ.https://t.co/aAeWakqsX7
— Lata Mangeshkar (@mangeshkarlata) August 17, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नाशिक
निवडणूक
निवडणूक
Advertisement