एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Lalbaugcha Raja Visarjan 2023: चैन पडेना आम्हाला... आज लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ होणार, कशी असेल विसर्जन मिरवणूक?

Lalbaugcha Raja Visarjan 2023 : दहा दिवसांच्या पाहुणचारानंतर नवसाला पावणारा लालबागचा राजा आज विसर्जनासाठी मार्गस्थ होणार आहे. कसा असेल राजाच्या विसर्जनाचा मार्ग, पाहुयात सविस्तर...

Lalbaugcha Raja Visarjan Miravnuk 2023 LIVE: नवसाला पावणारा अशी ख्याती असणारा आणि लालबाग-परळकरांसोबतच देशभरातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेला लालबागचा राजा (Lalbaugcha Raja) आज विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ होणार आहे. दहा दिवस लालबागच्या (Lalbaugcha Raja Visarjan) गणेश नगरात विराजमान असलेला लालबागचा राजा आज अकरा वाजता विसर्जनासाठी मार्गस्थ होणार आहे. त्यापूर्वी दहा वाजता लालबागच्या राजाची आरती होईल, त्यानंतर पारंपारिक कोळी नृत्यानं राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल. 

लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. लालबाग-परळ परिसरातील गणेशविसर्जन मिरवणूकांवर पोलिसांचं विशेष लक्ष असेल. लालबागचा राजा आणि मुंबईचा राजा विसर्जन मिरवणूकीत हजारोंच्या संख्येनं गणेशभक्त सहभागी होत असतात. त्याकरता विशेष व्यवस्था पोलीस प्रशासनाकडून करण्यात आली आहे.  

गुरुवारी, 28 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता लालबागच्या राजाची आरती होणार आहे. त्यानंतर सकाळी 11 वाजता लालबागच्या राजाची राजेशाही मिरवणूक लालबाग मार्केटमधून निघणार आहे. यामध्ये कोळी बांधवांकडून मानवंदना दिली जाते. मंडळाच्या सुरुवातीच्या वर्षांपासूनचीही परंपरा आहे. शुक्रवारी, 29 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाचं प्रस्थान होणार आहे. त्यानंतर शेवटची आरती करून लालबागच्या राजाचे विसर्जन सोहळा अरबी समुद्रात सुरू होईल. सकाळी 7.45 वाजण्याच्या सुमारास समुद्राला भरती आहे. त्यावेळी लालबागच्या राजाचं विसर्जन अरबी समुद्रात होणार असल्याची माहिती मंडळाच्यावतीने देण्यात आली. 

लालबाग-परळ परिसरातील गणेश विसर्जन मिरवणूकांकरता मुंबई पोलिसांची व्यवस्था 

  • केवळ लालबाग-परळ भागांत- 300 सीसीटीव्ही 
  • महिला सुरक्षेकरता 6 छेडछाडविरोधी पथक 
  • मोबाईल चोरी करता 6 विशेष पथके
  • एटीएस - आतंकवादी कारवाया रोखण्याकरता 
  • 3 बॉम्ब शोधक नाशक पथके  
  • रॅपीड अॅक्शन फोर्सची नियुक्ती
  • 5 एसआरपीएफ ची पथके
  • 3 दंगलनियंत्रक पथके
  • 3 सिसीटीव्ही व्हॅन  
  • 2500 पोल्स मित्र कार्यकर्ते
  • 6 वॉच टॉवर्स

कसा असेल लालबागच्या राजाच्या विसर्जनाचा मार्ग? 

श्री. गणेश नगर, लालबाग- गरमखडा जंक्शन उजवे वळण घेऊन नॉर्थ बॉन्ड डॉ. बी. ए. रोड ने भारतमाता जंक्शन भारतमाता जंक्शन येथून पुन्हा उजवे वळण घऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडने गरमखाडा जंक्शनला उजवे वळण घेणार. पुढे साने गुरूजी मार्गाने चिंचपोकळी ब्रिज वरून आर्थर रोड नाका-ना. म. जोशी मार्गाने बकरी अड्डा- एस. ब्रीज चौक, भायखळा रेल्वे स्टेशन पश्चिम, घोडके चौक, अग्निशमन दलासमोरून खडा पारसी जंक्शन क्लेअर रोड- नागपाडा जंक्शन- दोन टाकी रोड-संत सेना महाराज मार्ग-सुतार गल्ली माधव बाग- व्ही.पी. रोड-ऑपेरा हाऊस- गिरगांव चौपाटी- गिरगांव असा विसर्जन मार्ग आहे. 

दरम्यान, दहा दिवस गणपती बाप्पाची मनोभावे सेवा केल्यावर आज बाप्पाला निरोप देण्यात येईल. मुंबई आणि पुण्यात विसर्जानाचा उत्साह काही वेगळाच असतो. मुंबईत गणेशगल्लीतील मुंबईच्या राजाती मिरवणूक थोड्याच वेळात निघणार आहे, तर लालबागच्या राजाची आरती सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे. विसर्जनासाठी मुंबईतील अनेक प्रमुख रस्ते आज वाहतुकीसाठी बंद असतील.  

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Lalbaugcha Raja 2023 Visarjan LIVE: चैन पडेना आम्हाला... 10 दिवसांच्या पाहुणचारानंतर लालबागचा राजा आज निरोप घेणार, सकाळी 10 वाजता आरती, 11 वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
Akaay Kohli Photo Viral : विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2024 | रविवार
राष्ट्रवादीच्या पराभवानंतर राजकीय निवृत्तीबाबत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; निकालाबाबत स्पष्टच सांगितलं
राष्ट्रवादीच्या पराभवानंतर राजकीय निवृत्तीबाबत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; निकालाबाबत स्पष्टच सांगितलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bharat Gogawale Exclusive : मंत्रि‍पदासाठी शिवलेला कोट आता तरी घालणार? भरत गोगावले म्हणतातBharat Gogawale on Uddhav Thackeray :उद्धव ठाकरेंचे आमदार संपर्कात पण लगेच काही करणं बरोबर दिसत नाहीMahayuti CM Oath Ceremony : शपथविधी कधी पर्यंत झाला पाहिजे? कायदेशीर बाजू नेमकी काय?Sunil Shelke Meet Ajit Pawar : अजितदादांनी सांगितला मोदी-शेळकेंच्या भेटीचा किस्सा #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
Akaay Kohli Photo Viral : विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2024 | रविवार
राष्ट्रवादीच्या पराभवानंतर राजकीय निवृत्तीबाबत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; निकालाबाबत स्पष्टच सांगितलं
राष्ट्रवादीच्या पराभवानंतर राजकीय निवृत्तीबाबत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; निकालाबाबत स्पष्टच सांगितलं
Maharashtra Assembly Election Results 2024 : महायुतीच्या बटेंगे तो कटेंगे अन् एक है तो सेफ है च्या नाऱ्यातही किती मुस्लीम उमेदवारांना विजयी गुलाल?
महायुतीच्या बटेंगे तो कटेंगे अन् एक है तो सेफ है च्या नाऱ्यातही किती मुस्लीम उमेदवारांना विजयी गुलाल?
IPL Auction 2025 : युजवेंद्र चहलला लॉटरी, टीम इंडियात संधी मिळेना पण आयपीएलमध्ये पैशांचा वर्षाव, पंजाबकडून 18 कोटी खर्च
युजवेंद्र चहलला लॉटरी, टीम इंडियात संधी मिळेना पण आयपीएलमध्ये पैशांचा वर्षाव, पंजाबकडून 18 कोटी खर्च
ठाकरेंचा एकमेव मुस्लीम उमेदवार बनला आमदार; हारुण खान यांना खेचून आणला विजय, मताधिक्य किती?
ठाकरेंचा एकमेव मुस्लीम उमेदवार बनला आमदार; हारुण खान यांना खेचून आणला विजय, मताधिक्य किती?
Maharashtra Assembly Election Result 2024 : फक्त 162 मतांनी महायुतीच्या त्सुनामीत विजय खेचून आणलेला 'नशीबवान' उमेदवार माहीत आहेत का?
फक्त 162 मतांनी महायुतीच्या त्सुनामीत विजय खेचून आणलेला 'नशीबवान' उमेदवार माहीत आहेत का?
Embed widget