Lalbaugcha Raja 2023 Visarjan LIVE: लालबागच्या राजाचं विसर्जन संपन्न
Lalbaugcha Raja Visarjan LIVE:आज 10 दिवसांच्या पाहुणचारानंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ होईल.सकाळी 10 वाजता आरती पार पडेल, राजाच्या विसर्जनाची मिरवणुकीची सुरुवात पारंपारिक कोळी नृत्यानं होईल.
LIVE
Background
Lalbaugcha Raja 2023 Visarjan LIVE: नवसाला पावणारा अशी ख्याती असलेला, लालबाग-परळकरांसोबतच अखंड गिरणगाव आणि जगभरातील भक्तांचं श्रद्धास्थान असलेला लालबागचा राजा (Lalbaugcha Raja 2023) आज दहा दिवसांच्या पाहुणचारानंतर भक्तांचा निरोप घेणार आहे. दरवर्षीच लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भक्तांची अलोट गर्दी झाल्याचं पाहायला मिळतं. अगदी 24 तास रांगेत उभं राहून भक्त राजाच्या चरणी नतमस्कत होताना दिसतात. आज लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीतही भक्तांचा अलोट जनसागर पाहायला मिळणार आहे.
लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी मंडळाकडून तयारी काल (बुधवार)पासूनच सुरू करण्यात आली आहे. आज सकाळी दहा वाजता लालबागच्या राज्याची आरती होईल. त्यानंतर कोळ्यांना नैवेद्याचा मान असतो, नंतर सकाळी अकरा वाजता लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल. पारंपारिक कोळी नृत्यानं लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल आणि लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ होईल.
लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी कडेकोट बंदोबस्त
लालबाग-परळ परिसरातील गणेशविसर्जन मिरवणूकांवर पोलिसांचं विशेष लक्ष असेल. लालबागचा राजा आणि मुंबईचा राजा विसर्जन मिरवणूकीत हजारोंच्या संख्येनं गणेशभक्त सहभागी होतील. त्याकरता विशेष व्यवस्था पोलीस प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
लालबागचा राजा विसर्जन मार्ग
श्री. गणेश नगर, लालबाग- गरमखडा जंक्शन उजवे वळण घेऊन नॉर्थ बॉन्ड डॉ. बी. ए. रोड ने भारतमाता जंक्शन भारतमाता जंक्शन येथून पुन्हा उजवे वळण घऊन डॉ. बी.ए. रोडने गरमखाडा जंक्शन ला उजवे वळण घेऊन साने गुरूजी मार्गाने चिंचपोकळी ब्रिज वरून आर्थर रोड नाका - ना. म. जोशी मार्गने बकरी अड्डा- एस. ब्रीज चौक, भाखखळा रेल्वे स्टेशन पश्चिम, घोडके चौक, अग्निशमन दला समोरून खडा पारसी जंक्शन क्लेअर रोड- - नागपाडा जंक्शन- दोन टाकी रोड- संत सेना महाराज मार्ग- सुतार गल्ली माधव बाग- व्हि.पी. रोड- ऑपेरा हाऊस- गिरगांव चौपाटी- गिरगांव मुंबई येथे समाप्त
Lalbaugcha Raja 2023 Visarjan Live : लालबागच्या राजाचं विसर्जन
Lalbaugcha Raja 2023 Visarjan Live : नवसाला पावणारा अशी ख्याती असलेला, लालबाग-परळकरांसोबतच अखंड गिरणगाव आणि जगभरातील भक्तांचं श्रद्धास्थान असलेला लालबागचा राजा दहा दिवसांच्या पाहुणचारानंतर भक्तांचा निरोप घेतला. सकाळी नऊ वाजता लालबागचा राजा गिरगावच्या समुद्रात विसर्जित झाला.
Lalbaugcha Raja 2023 Visarjan Live : लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ, हायड्राॅलिक्सचा वापर करत राजाचं विसर्जन होईल
Lalbaugcha Raja 2023 Visarjan Live : लालबागचा राजाची आरती संपली असून विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे. समुद्रात मध्यभागी लालबागचा राजा असलेला तराफा आणि आजूबाजूला कोळी बांधवांच्या बोटी आहेत. चौपाटीपासून काही अंतरावर आत अरबी समुद्रात जात लालबागच्या राजाचं विसर्जन होईल. हायड्राॅलिक्सचा वापर करत लालबागच्या राजाचं विसर्जन होईल.
Lalbaugcha Raja 2023 Visarjan Live : वीस तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा गिरगाव चौपाटीजवळ पोहोचला
Lalbaugcha Raja 2023 Visarjan Live : वीस तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा गिरगाव चौपाटीजवळ पोहोचला झाला आहे. समुद्राला भरती आल्यानंतर लालबागच्या राजासह सर्व गणेश मूर्तींचं विसर्जन होणार आहे.
Lalbaugcha Raja 2023 Visarjan Live : लालबागचा राजा ओपेरा हाऊस परिसरापर्यंत पोहोचला
Lalbaugcha Raja 2023 Visarjan Live : लालबागचा राजा ओपेरा हाऊस परिसरापर्यंत आला आहे. समुद्राला ओहोटी आल्याने गणेश मूर्तीच्या विसर्जनासाठी उशीर होण्याची शक्यता आहे.
Ganpati Visarjan 2023 Live : बाप्पाच्या विसर्जनानंतर मुंबईतील समुद्रकिनारे स्वच्छ करण्याची मोहीम, अमृता फडणवीस उपस्थित राहणार
Ganpati Visarjan 2023 Live : बाप्पाच्या विसर्जनानंतर मुंबईतील समुद्रकिनारे स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिका, दिव्याज फाऊंडेशन आणि भामला फाऊंडेशन यांच्या वतीने ही स्वछता मोहीम हाती घेण्यात आली आहे. या स्वच्छता मोहिमेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि दिव्याज फाऊंडेशनच्या संस्थापक अमृता फडणवीस उपस्थित राहणार आहेत. या मोहिमेत अभिनेते राजकुमार राव, सैयामी खेर, जॅकी भगनानी यांच्यासह सुमारे पाच हजार स्वयंसेवक सहभागी होणार आहेत.