(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sanjay Raut : किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या तुरूंगात जातील ; संजय राऊत यांचा इशारा
Sanjay Raut : भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या लवकरच तुरूंगात जातील, असा इशारा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.
Sanjay Raut : पीएमसी बॅंक घोटाळ्यातील सुत्रधार आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांचा काय संबंध आहे? असा प्रश्न उपस्थित करत किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या तुरूंगात जातील, असा इशारा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.
किरीट सोमय्या गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीतील मंत्र्यांवर आरोप करत आहेत. संजय राऊत यांच्यावरही किरीट सोमय्या यांनी आरोप केले आहेत. संजय राऊत यांचे निकटवर्तीय आणि उद्योजक प्रवीण राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. त्यानंतर संजय राऊत यांनीही किरीट सोमय्या यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून किरीट सोमय्या विरूद्ध शिवसेना असाच संघर्ष सुरू आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या निशाण्यावर आता किरीट सोमय्या असल्याचे पाहायला मिळत आहे.
नील सोमय्यांनी बाजारभावापेक्षा कमी दरात अनेक ठिकाणी जमिनी विकत घेतल्याचा संजय राऊत यांनी केला आरोप होता. याबरोबरच पीएमसी घोटाळ्यातील मास्टरमाईंड राकेश वाधवान हा किरीट सोमय्या यांचा पार्टनर आहे. त्या राकेश वाधवान याने भाजपला 20 कोटी रुपयांचा निधी दिला होता, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. पीएमसी बँक घोटाळ्याच्या आधी सोमय्यांच्या जवळच्या अनेक लोकांनी त्यातून पैसे काढून घेतले आहेत. त्यामुळे किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांना अटक करा असं खासदार संजय राऊत म्हणाले होते. आता पुन्हा संजय राऊत यांनी याच प्रकरणाचा हवाला देत किरीट सोमय्या आणि नील सोमय्या तुरूंगात जाणार असा इशारा दिला आहे.
किरीट सोमय्या हे ईडीचे वसुली एजंट आहेत. सोमय्यांनी 2015 मध्ये मुंबई विमानतळाच्या जवळ असलेली HDIL आणि GVK या जमिनीच्या घोटाळ्या संदर्भात वारंवार एमएमआरडीएकडे तक्रारी केल्या आहेत. 2016 मध्ये तक्रार बंद केल्या आहे. त्यानंतर नील सोमय्या हे वाधवन सोबत निकोन इन्फ्रा कंपनीचे बिझनेस पार्टनर बनले आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
ईडीकडून व्यावसायिक आणि बिल्डरांना धमकावले जात आहे. केंद्रीय तपास यंत्रणांना चौकशीचा अधिकार आहे. त्याचप्रमाणे मुंबई पोलिसांनाही अधिकार आहेत. पुढच्या पत्रकार परिषदेत ईडीच्या अधिकाऱ्यांची नावं जाहीर करणार, असाही इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
आयटी आणि ईडीला आतापर्यंत आम्ही 50 जणांविरोधात पुरावे दिले आहेत. परंतु, ईडीकडून फक्त सरकार पाडण्याच्या हेतूने महाराष्ट्रात धाडी टाकल्या जात आहेत. ईडीने आतापर्यंत सर्वात जास्त धाडी महाराष्ट्रात टाकल्या आहेत. शिवसेनेलाही धाडी टाकण्याचा अधिकार आहे. आता आम्ही पण एक धाड टाकणार असेही संजय राऊत यांनी यावेळी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
Sanjay Raut: आयकर खात्याच्या भानामतीमागे कोण आहे याचा पर्दाफाश करणार; संजय राऊतांचा इशारा
Sanjay Raut Press Conferance : पंतप्रधानांना 13 पानी पत्र लिहलंय, आम्ही पण एक धाड टाकतोय...