Video: 'मी बिहारला गेलो नाही, पण..' जागांसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत भांडत बसलेल्या काँग्रेसला ज्येष्ठ नेते पृथ्वीराज बाबांनी आरसा दाखवला!
Prithviraj Chavan On Congress: पीटीआयशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षाला आरसा दाखवणारे वक्तव्य केले असून, त्यांनी काँग्रेस सल्लागारांच्या निर्णयक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

Prithviraj Chavan On Congress: बिहार निवडणुकीचे निकाल देशभरात चर्चेचा विषय ठरत असताना काँग्रेसच्या अंतर्गत गोंधळ, चुकीचे अंदाज आणि अपयशी रणनीती यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट बोट ठेवले आहे. पीटीआयशी बोलताना चव्हाण यांनी पक्षाला आरसा दाखवणारे वक्तव्य केले असून, त्यांनी काँग्रेस सल्लागारांच्या निर्णयक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
तर जास्त जागा मिळू शकल्या असत्या
“मी बिहारला गेलो नाही, पण संपूर्ण राज्यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही,”असे सांगत त्यांनी काँग्रेसच्या निवडणूक तयारीतील दोष उघडपणे मांडले. त्यांच्या मते, काँग्रेसने स्वतःचे मूल्यमापन न करता चुकीच्या आकड्यांवर आणि चुकीच्या सल्लागारांवर विसंबून संधी दडवली. चव्हाण यांनी स्पष्ट सांगितले की काँग्रेसच्या सल्लागारांनी दिलेले अंदाज वास्तवापासून दूर होते. “आपल्याकडे 19 जागा होत्या, त्या 21 किंवा 22 झाल्या असत्या, अगदी 17-18 झाले असते तरी ठीक, पण निवडक 30 जागा लढल्या असत्या आणि राजदला 40 जागा देण्याची भूमिका घ्यायला हवी होती. त्यांच्या मते, जागावाटपात उदारमतवादी भूमिका घेतली असती तर जास्त जागा मिळू शकल्या असत्या.
VIDEO | Mumbai: Congress leader and former Maharashtra CM Prithviraj Chavan (@prithvrj) said, "I was watching all the updates from the Bihar elections, but since I didn’t actually visit Bihar, I feel it’s not appropriate for me to comment on the entire state. I can, however,… pic.twitter.com/UETp0Czt5i
— Press Trust of India (@PTI_News) November 15, 2025
विचारांची लढाई एक-दोन दिवसात संपत नाही
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, मी संपूर्ण बिहार निवडणूक पाहत आहे, पण मी बिहारला गेलो नाही, त्यामुळे संपूर्ण राज्याबद्दल बोलणे माझ्यासाठी योग्य ठरणार नाही. मी काँग्रेस पक्षाबद्दल काहीतरी सांगू शकतो, तेही, जे मी थोडं पाहिलं आहे. आपण काँग्रेस पक्षाचे आत्मपरीक्षण करत आहोत. जेव्हा जेव्हा विचारांची लढाई असते तेव्हा ती एक-दोन दिवसात संपत नाही. महात्मा गांधींना त्यांचे विचार पोहोचवण्यासाठी, आंबेडकरांना त्यांचे विचार पोहोचवण्यासाठी किती वेळ लागला हे तुम्हाला माहिती आहे. तो काळ देशाच्या इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा होता. त्यांनी पुढे सांगितले की, विचारांची लढाई खूप वेदनादायक आहे. चढ-उतार असतात. याचे मूल्यांकन करताना, मला कदाचित एकच गोष्ट वाटेल, दूरवरून, काँग्रेस पक्षाचे सल्लागार जे मतांचे आरक्षण करत होते, त्यांनी कदाचित योग्य आकडे दिले नसतील. आपण निवडक 30 जागा घेत उर्वरित 40 जागा राजदला दिल्या असत्या तर एक चांगला संदेश गेला असता आणि कदाचित जागांची संख्या काहींनी वाढली असती. आपण स्वतःचे परीक्षण केले पाहिजे, काँग्रेस काय करत आहे याचे आत्मपरीक्षण केले पाहिजे.
इतर महत्वाच्या बातम्या























