Sanjay Raut : पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात ठराविक लोकांवरच धाडी का? संजय राऊत यांचा सवाल
Sanjay raut press conference : आयकर विभागाची भानामती महाराष्ट्रात सुरू असून त्याचा खुलासा लवकरच आम्ही करणार असल्याचे संजय राऊत म्हणाले,
![Sanjay Raut : पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात ठराविक लोकांवरच धाडी का? संजय राऊत यांचा सवाल Sanjay raut press conference today live shiv sena vs bjp allegations on ed income tax cbi latest marathi news devendra fadnavis nawab malik Sanjay Raut : पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात ठराविक लोकांवरच धाडी का? संजय राऊत यांचा सवाल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/08/d6f9590ca8b180997bbcbbf827880337_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : देशात सर्वाधिक ईडीच्या कारवा म्हाराष्ट्रात झाल्या आहे. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमधील ठराविक लोकांना केंद्रीय यंत्रणेकडून लक्ष्य का केले जाते हा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. पुढे ते म्हणाले, केंद्रीय यंत्रणाकडून दबाव टाकून सरकार पाडण्याचा हा डाव आहे.शिवसेना नेते संजय राऊत पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत उपस्थित होते.
आयकर खात्याच्या भानामतीमागे कोण आहे याचा पर्दाफाश करणार
संजय राऊत म्हणाले, आज मुंबईत धाडीवर धाडी पडत आहे. आमच्या घरात महाराष्ट्रात जर कोणी घुसत असेल तर शिवसेनेला देखील दुसऱ्यांच्या घरी धाडी टाकण्याचा अधिकार आहे. देशात सर्वाधिक ईडीच्या कारवाया म्हाराष्ट्रात झाल्या आहे. महाविकास आघाडीच्या 14 प्रमुख नेत्यांवर कारवाई झाली मात्र भाजपच्या लोकांवर मात्र कारवाई का होत नाही. ईडीला आणि आयटीला आतापर्यंत आम्ही 50 जणांची यादी पुराव्यासकट दिली आहे, पण त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्याचा खुलासा लवकरच आम्ही करणार आहे.
ईडी आणि ईडीचे अधिकारी हे भाजपचे एटीएम मशीन
ईडी आणि ईडीचे अधिकारी हे भाजपचे एटीएम मशीन बनले आहे. याबाबत मी 28 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या संदर्भात पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये स्वच्छ भारत अभियानामध्ये नुसता कचरा नाही तर भ्रष्टाचार सुद्धा साफ करायचा आहे. ज्या ईडीला तुम्ही सगळ्यांच्या विरोधात लावलं आहे. या संदर्भात दहा भाग मी त्यांना देणार आहे. हा आजचा एक भाग असल्याचे संजय राऊत म्हणाले.
लवकरच बाप - बेटे जेलमध्ये जाणार
किरीट सोमय्या यांनी 2015 मध्ये मुंबई विमानतळाच्या जवळ असलेली HDIL आणि GVK या जमिनीच्या घोटाळ्या संदर्भात वारंवार एमएमआरडीएकडे तक्रारी केल्या आहेत. 2016 मध्ये तक्रार बंद केल्या आहे. त्यानंतर निल सोमय्या हे वाधवन सोबत निकोन इन्फ्रा कंपनीचे बिझनेस पार्टनर बनले. ते आता बोलतायत माझ्या बद्दल कोणतही तक्रार दाखल झालेली नाही. लवकरच हे बाप बेटे जेलमध्ये जाणार आहे.
संबंधित बातम्या :
Sanjay Raut : पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात ठराविक लोकांवरच धाडी का? संजय राऊत यांचा सवाल
Sanjay Raut: आयकर खात्याच्या भानामतीमागे कोण आहे याचा पर्दाफाश करणार; संजय राऊतांचा इशारा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)