एक्स्प्लोर

शेतकऱ्यांना बांधावरच बी बियाणांसाठी नियोजन, राज्य सरकारची खरीप हंगामाची बैठक

आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत खरीप हंगाम बैठक पार पडली. बैठकीत शेतकऱ्यांना बांधावरच बी बियाणं देणं, खरीप हंगाम, शेतमाल विक्री यावर चर्चा झाली.

मुंबई : शेतकऱ्यांना बांधावरच बी बियाणांसाठी मिळावेत म्हणून 3 हजार शेतकरी गटांच्या मदतीने नियोजन सुरु आहे. 54 हजार मेट्रिक टन बियाणे पोहोचविणे सुरु असून गर्दी टाळण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती मिळाली आहे. आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत खरीप हंगाम बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. तर मंत्रालयातून उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री दादाजी भुसे, अनिल देशमुख, मंत्री जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, धनंजय मुंडे, विश्वजित कदम उपस्थित होते. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, आपल्या सरकारला6  महिने पूर्ण होत आहेत. एक चांगला अर्थसंकल्प मांडला आणि कोरोनाचा वेढा आपल्याला पडला. आज देशाचीच अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे. अन्न धान्याच्या दृष्टीने बाजारपेठेचा अंदाज घेऊन महाराष्ट्र पुढील काळात काय करू शकतो ते पाहण्याची गरज आहे. कोरोना नंतर जग बदलणार आहे, अर्थातच त्यात कृषी क्षेत्राची भूमिका महत्वाची आहे. दर्जेदार पिक घेऊन मोठ्या प्रमाणावर निर्यात कशी होईल हेही आपण पहिले पाहिजे. पिक कर्जाबाबत रिझर्व्ह बँकेकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहोत. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले. कापूस, ज्वारी, मका खरेदी सुरू राज्यात 410 लाख क्विंटल कापसाचे उत्पादन झाले. आतापर्यंत 344 लाख क्विंटल कापसाची खरेदी झाली. शिल्लक कापूस 15 ते 20 जून पर्यंतखरेदी केला जाईल. 163 कापूस खरेदी केंद्र कार्यरत. दररोज 2 लाख क्विंटल पर्यंत कापसाची खरेदी करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यात 98 हजार 933 शेतकऱ्यांकडून 9 लाख क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आली आहे. राज्यात ज्वारी, मका, खरेदीसाठी 75 केंद्र सुरू आहेत. त्यात 29 जिल्ह्यांचा समावेश आहे. उन्हाळी धान खरेदीसाठी 293 खरेदी केंद्र असून आतापर्यंत 1 लाख क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. राज्यात विविध पिकांखाली एकूण खरीप क्षेत्र 140.11 लाख हेक्टर आहे. यात सोयाबीन व कापूस 82 लाख हेक्टर इतके आहे. शेतकऱ्यांना बियाणांची गरज 16.15 लाख क्विंटल आहे. तर बियाणांची उपलब्धता 17.01 लाख क्विंटल इतकी आहे. सोयाबीन व कापूस या पिकांखाली खरीपाचे 60 टक्के क्षेत्र आहे, अशी माहिती आहे. मागच्या वर्षी तुरीत चांगली वाढ झाली. सोयाबीन आणि कापसातही मागच्या वर्षी चांगली वाढ असल्याची माहिती या बैठकीतून मिळाली आहे. 2020 चा नैऋत्य मौसमी पाउस सरासरी 96 % ते 104 % टक्के राहील असा अंदाज आहे. तर अल-निनो सामान्य राहणार. ऑगस्ट सप्टेंबर मध्ये सौम्य स्वरूपात अल निनोची स्थिती असेल. मान्सूनचे केरळला आगमन 5 जूनला होईल असा अंदाज आहे. मौसमी पाउस राज्यात काहीसा उशिरा येईल. मुंबईत ११ जूनपासून पाऊस सुरु होईल पण 18 जूनपर्यंत सर्व राज्यात पसरेल. शेतकऱ्यांना बांधावरच बी बियाणांसाठी नियोजन, राज्य सरकारची खरीप हंगामाची बैठक लॉकडाऊननंतर काय?
  • लॉकडाऊन नंतर दररोज 2 हजार टन भाजीपाला आणि फळे यांची 3200 पेक्षा जास्त ठिकाणी उत्पादक ते ग्राहक थेट विक्री.
  • 3790 गटांमार्फत 9 लाख 68 हजार 550 क्विंटल फळे व भाजीपाला ऑनलाईन व थेट विक्री. यासाठी राज्यात 3212 थेट विक्री केंद्रे स्थापन.
  • हापूस आंब्याच्या विक्रीसाठी कृषी व पणन विभागामार्फत प्रयत्न
  • कृषी माल निर्यातीसाठी आवश्यक फायटोसेनिटरी प्रमाणपत्रे देण्यात येत आहेत.
  • शेतमाल आणि कृषी निविष्ठा विक्रीसाठी आणि वाहतुकीसाठी परिवहन आणि गृह विभागाचे परवाने
  • बहुतेक कृषी उत्पन्न बाजार समित्यातून शेतमालाची विक्री
  • शेतकऱ्यांच्या ऑनलाईन मार्गदर्शन व प्रशिक्षण
  • जिल्ह्यातील सर्व बियाणे प्रक्रिया केंद्रे सुरु
  • बियाणे उत्पादक कंपन्यांशी सातत्याने व्हिसीद्वारे संपर्क
  • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाचे जिल्हा आणि राज्य स्तरावर नियंत्रण कक्ष
  • शेतकऱ्यांना बांधावरच बी बियाणे मिळावेत म्हणून 3 हजार शेतकरी गटांच्या मदतीने नियोजन.
  • 54 हजार मेट्रिक टन बियाणे पोहोचविणे सुरु. गर्दी टाळण्यासाठी प्रयत्न.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Accident : नाशिकच्या भीषण अपघातात पाच जणांचा दुर्दैवी अंत, मंत्री गिरीश महाजनांनी घेतला मोठा निर्णय
नाशिकच्या भीषण अपघातात पाच जणांचा दुर्दैवी अंत, मंत्री गिरीश महाजनांनी घेतला मोठा निर्णय
IPO Update : शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स कोसळला पण स्टँडर्ड ग्लासचा आयपीओ लिस्ट होताच गुंतवणूकदारांची तगडी कमाई
शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स कोसळला पण स्टँडर्ड ग्लासचा आयपीओ लिस्ट होताच गुंतवणूकदारांची कमाई
Bhiwandi News: मूळव्याधाचा त्रास असह्य झाला, रोजच्या वेदनांनी जीव नकोसा, भिवंडीतील रिक्षाचालकाने आयुष्य संपवलं
मूळव्याधाचा त्रास असह्य झाला, रोजच्या वेदनांनी जीव नकोसा, भिवंडीतील रिक्षाचालकाने आयुष्य संपवलं
Girish Mahajan : नाशिकच्या भीषण अपघातातील मृतांचा आकडा 5 वर, 3 गंभीर; मंत्री गिरीश महाजनांकडून मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत
नाशिकच्या भीषण अपघातातील मृतांचा आकडा 5 वर; मंत्री गिरीश महाजनांकडून मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची शासकीय मदत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 13 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्सSanjay Raut Mumbai : मुख्य आरोपी मोकाट, ..त्यांचे बॉस मंत्रिमंडळात आहेत; बीड प्रकरणावर राऊत आक्रमकABP Majha Marathi News Headlines 10AMHeadlines 10AM 13 January 2025 सकाळी 10 च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Accident : नाशिकच्या भीषण अपघातात पाच जणांचा दुर्दैवी अंत, मंत्री गिरीश महाजनांनी घेतला मोठा निर्णय
नाशिकच्या भीषण अपघातात पाच जणांचा दुर्दैवी अंत, मंत्री गिरीश महाजनांनी घेतला मोठा निर्णय
IPO Update : शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स कोसळला पण स्टँडर्ड ग्लासचा आयपीओ लिस्ट होताच गुंतवणूकदारांची तगडी कमाई
शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स कोसळला पण स्टँडर्ड ग्लासचा आयपीओ लिस्ट होताच गुंतवणूकदारांची कमाई
Bhiwandi News: मूळव्याधाचा त्रास असह्य झाला, रोजच्या वेदनांनी जीव नकोसा, भिवंडीतील रिक्षाचालकाने आयुष्य संपवलं
मूळव्याधाचा त्रास असह्य झाला, रोजच्या वेदनांनी जीव नकोसा, भिवंडीतील रिक्षाचालकाने आयुष्य संपवलं
Girish Mahajan : नाशिकच्या भीषण अपघातातील मृतांचा आकडा 5 वर, 3 गंभीर; मंत्री गिरीश महाजनांकडून मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत
नाशिकच्या भीषण अपघातातील मृतांचा आकडा 5 वर; मंत्री गिरीश महाजनांकडून मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची शासकीय मदत
Nashik Crime : नाशिकमधील पोलीस अंमलदारास 'भाईगिरी' भोवली, पोलीस अधीक्षकांची मोठी कारवाई
नाशिकमधील पोलीस अंमलदारास 'भाईगिरी' भोवली, पोलीस अधीक्षकांची मोठी कारवाई
Yograj Singh : तेव्हा युवराजचा मृत्यू झाला असता, तरी त्याचा अभिमान वाटला असता, कपिल देवला गोळी घालायला गेलो होतो; 'सिक्सर किंग'च्या बापाची सनसनाटी मुलाखत!
तेव्हा युवराजचा मृत्यू झाला असता, तरी त्याचा अभिमान वाटला असता, कपिल देवला गोळी घालायला गेलो होतो; 'सिक्सर किंग'च्या बापाची सनसनाटी मुलाखत!
MAHARERA : स्वयंविनियामक संस्थांमधील 2 वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेले 'ते' प्रतिनिधी तातडीने बदलला, महारेराचे निर्देश, कारण समोर
स्वयंविनियामक संस्थांमधील 2 वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेले 'ते' प्रतिनिधी तातडीने बदलला, महारेराचे निर्देश, कारण समोर
Santosh Deshmukh Case: एसआयटीचा प्रमुख अन् दोन बड्या वकिलांची नावं सांगितली, मस्साजोगच्या गावकऱ्यांच्या 5 मागण्या, संक्रातीला टोकाचं पाऊल उचलण्याचा इशारा
एसआयटीचा प्रमुख अन् दोन बड्या वकिलांची नावं सांगितली, मस्साजोगच्या गावकऱ्यांच्या 5 मागण्या, संक्रातीला टोकाचं पाऊल उचलण्याचा इशारा
Embed widget