सावधान! रस्त्यावर कचरा फेकाल तर थेट कोर्टात जावं लागेल
पालिका प्रशासनाकडून कचरा व्यवस्थापनासाठी कितीही प्रयत्न केले गेले, तरीही रस्त्यावर कचरा फेकणाऱ्यांचं प्रमाण काही केल्या कमी होताना दिसत नाही

कल्याण : पालिका प्रशासनाकडून कचरा व्यवस्थापनासाठी कितीही प्रयत्न केले गेले, तरीही रस्त्यावर कचरा फेकणाऱ्यांचं प्रमाण काही केल्या कमी होताना दिसत नाही. यावरच आता काही कठोर पावलं उचलत रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांना पालिका प्रशासन थेट कोर्टात खेचणार आहे. कल्याण- डोंबिवलीच्या पालिका प्रशासनानं यासंबंधीचा निर्णय घेतला आहे.
शहर स्वच्छतेबाबत उदासीन असणाऱ्या बेजबाबदार नागरिकाविरोधात पालिकेने पोलिसांच्या मदतीने कठोर कारवाई सुरू केली आहे. रस्त्यावर कुणी कचरा टाकताना आढळल्यास तात्काळ गुन्हा दाखल करत त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे.
केडीएमसीची डोकेदुखी ठरलेला कचरा प्रश्न मार्गी लावण्यासाठी केडीएमसीने विविध उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. ओला आणि सुका कचरा वर्गीकरण, सोसायटीमध्ये कचरा विघटन प्रकल्प, बायोगॅस प्लांट अशा विविध उपायोजना इथं सुरू करण्यात आल्या आहेत.
जेजुरीत 10 ते 12 तारखेपर्यंत जमावबंदी; महाशिवरात्रीला खंडोबा मंदिरात दर्शनास मनाई
एकीकडे शहराला कचरा मुक्त करण्यासाठी केडीएमसी प्रयत्नशील असून नागरिकांध्ये रस्त्यावर कचरा टाकू नये याबाबत जनजागृती सुरू करण्यात आलीय. तरीही असेही काही नागरीक आहेत बेजबाबदार पणे वागत कचरा रस्त्यावर फेकत आहेत, आशा नागरिकाविरोधात महापालिकेने दंडात्मक कारवाई सुरु केली होती. मात्र त्याचा काही एक फायदा झाल्याचे दिसत नव्हते. त्यामुळे महापालिका प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने एक नवी मोहिम सुरु केली आहे. रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांना आता थेट कोर्टात हजर राहावे लागणार आहे. त्यामुळे आता या कारवाईजा बडगा आपल्यावर उगारला जाऊ नये, असं वाटत असेल तर रस्त्यावर कचरा टाकण्यापूर्वी पुन्हा एकदा विचार करा.
























