एक्स्प्लोर

जॉन्सन अँड जॉन्सनला हायकोर्टाचा दिलासा; पावडरचं उत्पादन सुरू ठेवण्यास परवानगी, मात्र विक्रीवरील बंदी कायम

जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीचा बेबी पावडरसाठीचा परवाना रद्द करण्याचा निर्णय योग्यच असून नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं असल्याचा दावा राज्य सरकारनं हायकोर्टात केला आहे.

johnson baby powder case : जॉन्सन अँड जॉन्सनला हायकोर्टानं (Bombay High Court)  पुन्हा एकदा दिलासा दिला आहे. कंपनीचा बेबी पावडर (johnson baby powder) बनवण्याचा परवाना संपलेला असतानाही हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्यानं हायकोर्टानं पुढील निर्देश येईपर्यंत त्यांना पावडरचं उत्पादन सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र हे उत्पादन करताना एफडीनं (FDA) लावलेली विक्री आणि वितरणावरील बंदी 3 जानेवारीपर्यंत कायम राहील असं हायकोर्टानं (Mumbai Highcourt) आपल्या आदेशात स्पष्ट केलं आहे. 

परवाना रद्द करण्याचा निर्णय योग्यच, राज्य सरकारचा हायकोर्टात दावा

जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीचा बेबी पावडरसाठीचा परवाना रद्द करण्याचा निर्णय योग्यच असून नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं असल्याचा दावा राज्य सरकारनं हायकोर्टात केला आहे. औषध आणि सौंदर्य प्रसाधनं कायदा आणि लोकांच्या आरोग्याचं रक्षण करण्यासाठी असलेल्या नियमांची अंमलबजावणी न केल्यास आपल्या कर्तव्याचं पालन करण्यात सरकार अपयशी ठरेल, असा दावाही सरकारनं हायकोर्टात केला आहे. ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षित  उत्पादनांची निर्मिती आणि पुरवठा करणं ही याचिकाकर्त्या कंपनीची नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे बेबी पावडरच्या गुणवत्तेची खात्री न देता त्याचा अंतिम वापर होईपर्यंत नियमांनुसार उत्पादन विक्री करता येणार नाही, अशी ठाम भूमिका राज्य सरकारनं हायकोर्टात मांडली आहे.

बेबी पावडरच्या उत्पादन व विक्रीस मुभा देण्याची मागणी

जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीनं एफडीएच्या परवाना रद्द करण्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडर या लोकप्रिय उत्पादनात प्रमाणाबाहेर असलेले जीवाणू कमी करण्यासाठी आरोग्यास हानीकारक अशी निर्जंतुकीकरण प्रक्रिया केल्याच्या आरोप करून त्यांचा सर्वच्या सर्व प्रसाधनं उत्पादन परवाना रद्द अन्न व औषध प्रशासनानं नुकताच रद्द केला आहे. मात्र हा निर्णय अन्यायकारक असल्यानं ही याचिका निकाली निघेपर्यंत त्याला स्थगिती देत मुलुंड येथील कंपनीच्या प्रकल्पामध्ये बेबी पावडरच्या उत्पादन व विक्रीस मुभा देण्याची मागणी या याचिकेतून केली आहे. न्यायमूर्ती रमेश धानुका आणि न्यायमूर्ती मिलिंद साठ्ये यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली. 
 
काय आहे प्रकरण -
 
अन्न व औषध प्रशासन विभागानं 15 सप्टेंबरपासून कंपनीचा परवाना रद्द करण्याचा आदेश काढल्याची माहिती कंपनीतर्फे हायकोर्टात देण्यात आली. मात्र पाच दिवसांनंतर, एफडीए आयुक्तांनी या आदेशाचं पुनरावलोकन करत कंपनीनं तात्काळ मुलुंड येथील प्रकल्पात सुरू असलेलं बेबी पावडरचं उत्पादन आणि विक्री थांबविण्याचे आदेश काढले. या आदेशाला अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांसमोर कंपनीकडून रितसर आव्हान देण्यात आलं होतं. मात्र त्यांनी सुनावणीनंतर हे अपील फेटाळून लावलं. तसेच आदेशाला स्थगिती देण्यासही नकार दिला. त्यामुळे अखेर मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतल्याचा दावा जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीनं केला आहे.
 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Nitesh Rane : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
Mumbai High Court : ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal : जे काही काम करू शकत नाही त्यांचे बदल झाले पाहिजे :छगन भुजबळGulabrao Patil : पालकमंत्रिपदाबाबत Dada Bhuse, Bharat Gogawaleवर अन्याय: गुलाबराव पाटीलABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01 PM 19 January 2024Saif Ali Khan Attacker Arrest सैफचा आरोपी 'या' लेबर कँपमध्ये लपला होता, 'माझा'चा Exclusvie Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Nitesh Rane : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
Mumbai High Court : ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मनु भाकरच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, मायेची सावली हरपली; रस्त्यावरील भीषण अपघातात आजी अन् मामाचा मृत्यू
मनु भाकरच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, मायेची सावली हरपली; रस्त्यावरील भीषण अपघातात आजी अन् मामाचा मृत्यू
गोगावलेंना रायगडचे तर भुसेंना नाशिकचे पालकमंत्रीपद मिळायला हवं होतं, यादी जाहीर झाल्यावर धक्का बसला : उदय सामंत
गोगावलेंना रायगडचे तर भुसेंना नाशिकचे पालकमंत्रीपद मिळायला हवं होतं, यादी जाहीर झाल्यावर धक्का बसला : उदय सामंत
Pandharpur Crime : चार दिवसाचं ट्रेनिंग अन् दहावी पास बोगस डॉक्टरने थाटला पंढरपुरात दवाखाना, पोलिसांना कुणकुण लागताच फुटलं बिंग; नेमकं काय घडलं?
चार दिवसाचं ट्रेनिंग अन् दहावी पास बोगस डॉक्टरने थाटला पंढरपुरात दवाखाना, पोलिसांना कुणकुण लागताच फुटलं बिंग; नेमकं काय घडलं?
Dhananjay Munde: मला ठरवून टार्गेट केलं जातंय, पण मी अभिमन्यू नाही, मी अर्जुन आहे; धनंजय मुंडेंनी दंड थोपटले
मला ठरवून टार्गेट केलं जातंय, पण मी अभिमन्यू नाही, मी अर्जुन आहे; धनंजय मुंडेंनी दंड थोपटले
Embed widget