एक्स्प्लोर
उल्हासनगरातील जीन्स कारखान्यांवर बंदीची टांगती तलवार
उल्हासनगर शहरात 500 पेक्षा जास्त जीन्स कारखाने असून त्यात जीन्स शिलाईपासून सगळी कामं होतात.
![उल्हासनगरातील जीन्स कारखान्यांवर बंदीची टांगती तलवार jeans factories from ulhasnagar in trouble उल्हासनगरातील जीन्स कारखान्यांवर बंदीची टांगती तलवार](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/11/16102900/jeans.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: उल्हासनगरातील 511 जीन्स कारखान्यांवर बंदीची टांगती तलवार आहे. कारण उल्हासनगर महापालिकेनं शहरातील जीन्स वॉश कारखान्यांना दणका दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पाळा, अन्यथा कठोर कारवाईला तयार राहा, असा सज्जड दम महापालिकेनं या कारखान्यांना दिला आहे.
उल्हासनगर शहरात 500 पेक्षा जास्त जीन्स कारखाने असून त्यात जीन्स शिलाईपासून सगळी कामं होतात. यातील जीन्सला रंग देण्याच्या कामात घातक केमिकल्सचा वापर करण्यात येतो. यानंतर त्याचं सांडपाणी वालधुनी नदीत कुठल्याही प्रक्रियेशिवाय सोडण्यात येतं.
या प्रदूषणामुळे वालधुनी नदीचं नाल्यात रुपांतर झालं आहे. याविरोधात वनशक्ती एनजीओने केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला फटकारलं होतं.
जीन्सवरच्या छोट्या बटणांचा उपयोग काय?
यानंतर आता उल्हासनगर महापालिकेनं जीन्स कारखान्यांना इशारा दिला. यापुढे जीन्स वॉशचं पाणी प्रक्रिया केल्याशिवाय नदीत सोडल्यास या कारखान्यांचा वीज आणि पाणीपुरवठा खंडित करण्यात येईल, तसंचं त्यानंतरही या कारखान्यांनी प्रदूषण कायम ठेवल्यास त्यांच्यावर थेट बंदीची कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी दिला.जीन्सच्या आतील चोरखिशाचा खरा हेतू माहितेय का?
त्यामुळं आता कारखाने वाचवायचे असतील, तर जीन्स कारखान्यांना सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारावं लागणार आहे. संबंधित बातम्या जीन्स खरेदी करताना तुम्ही ही चूक करताय?टाईट जीन्समुळे तरुणी रुग्णालयात, पाय सुजल्याने डॉक्टरांनी जीन्स कापली!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)