Narendra Modi : छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतात नौसेनेला नवं सामर्थ्य दिलं, नवं व्हिजन दिलं : नरेंद्र मोदी
Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील कार्यक्रमात आयएनएस निलगिरी, आयएनएस सुरत आणि पाणबुडी वाघशीर राष्ट्राला अर्पण केली.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतील नौदलाच्या गोदीत आयएनएस सुरत, आयएनएस निलगिरी या युद्धनौका आयएनएस वाघशीर या पाणबुडीचं राष्ट्रार्पण झालं. यावेळी केंद्रीय संरक्षणमंत्री राजानाथ सिंह, महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह नौदलाचे अधिकारी उपस्थित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलं.
नरेंद्र मोदी यांनी आजचा दिवस आर्मी दिवस म्हणून साजरा केला जातो. देशाच्या संरक्षणासाठी आपलं जीवन समर्पित करणाऱ्या प्रत्येकाला नमन करतो, असं नरेंद्र मोदी म्हणाले. भारताच्या सेवेत कार्यरत असणाऱ्या प्रत्येकाला आज शुभेच्छा देतो. आज भारताचा सागरी वारसा नेव्हीच्या गौरवशाली इतिहास, आत्मनिर्भर भारत अभियानासाठी मोठा दिवस आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतात नौसेनेला नवं सामर्थ्य दिलं होतं, नवं व्हिजन दिलं होतं. आज त्यांच्या पवित्र धरतीवर 21 व्या शतकात नेव्हीला सशक्त करण्याच्या दिशेनं मोठं पाऊल उचलत आहे. हे पहिल्यांदा होत आहे की एक पाणबुडी, फ्रिगेट, सबमरीन यांना एकाच वेळी राष्ट्रार्पण केलं जात आहे. या तीन नौका मेड इन इंडिया आहेत. मी भारतीय नौसेनेला, सर्व श्रमिकांना, प्रत्येक भारतीयांना शुभेच्छा देतो. आजचा हा कार्यक्रम आपल्या गौरवशाली वारश्याला भविष्याच्या आकांक्षांशी जोडतो.
सागरी यात्रा, व्यापार, नेवल डिफेन्स, शिप इंडस्ट्री यात आपला समृद्ध इतिहास राहिला आहे. आपल्या इतिहासातून प्रेरणा घेत आजचा भारत जगातील प्रमुख सागरी शक्ती बनत आहे. निलगिरी चोल वंशाच्या सागरी सामर्थ्याला समर्पित आहे. सुरत युद्धनौका गुजरातच्या व्यापारानं पश्चिम आशियाशी जोडला होता, त्याचा संदर्भ आहे. वाघशीर या पाणबुडीला राष्ट्रार्पण करण्याचं सौभाग्य मिळालं आहे. या युद्धनौका आणि पाणबुडी भारताच्या सुरक्षा आणि प्रगतीला नवं सामर्थ्य देतील. आज भारत संपूर्ण जगाला आणि ग्लोबल साऊथमध्ये आश्वासक आणि जबाबदार साथीदार म्हणून पाहिला जात आहे. भारत विस्तारवादानं नव्हे तर विकासवादानं काम केलं आहे.
भारतानं नेहमी खुल्या, सुरक्षित, सर्वसमावेशक, वैभवशाली इंडो पॅसिफिक भागाचं समर्थन केलं आहे. समुद्र किनारा असलेल्या देशांच्या विकासाची गोष्ट आली तेव्हा भारतानं मंत्र दिला तो म्हणजे सागर, सागरचा अर्थ असा आहे की, सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन, असं नरेंद्र मोदी म्हणाले. आम्ही सागराच्या व्हिजनसह पुढं चाललो आहोत. जी 20 आयोजनावेळी आम्ही जगाला मंत्र दिला, वन अर्थ, वन फॅमिली, वन फ्युचर, असं नरेंद्र मोदी म्हणाले. नरेंद्र मोदी यांनी या भाषणात पुढं सरकारनं सबका साथ सबका विश्वास या सिद्धांतावर काम करणारी लोकं आहोत, असं म्हणत त्यांच्या सरकार करण्यात येत असलेल्या कामांची माहिती दिली.
इतर बातम्या :