एक्स्प्लोर

खाजगी वाहनांचा डिलिव्हरीसाठी वापर, पालिकेकडे वारंवार तक्रार करूनही कारवाई नाही, हायकोर्टात याचिका

indian hotel association : स्विगी, झोमॅटो या ॲप्सवरही बेकायदेशीर हॉटेलांना सेवा पुरवल्याचा आरोप, इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनची हायकोर्टात याचिका, सोमवारी सुनावणी

Indian Hotel Association : लॉकडाऊनच्या काळात स्विगी, झोमॅटो आणि डंझो या मोबाईल ॲपचा वापर करून बेकायदेशीररित्या खाद्यपदार्थांची विक्री करणारी फूड आऊटलेट थाटण्यात आली आहेत. त्याविरोधात आता इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशननं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून अशा आऊटलेट्सविरोधात तसेच त्यांना सेवा पुरवणा-या या ॲप्सवरही कडक कारवाई करण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.

या बेकायदेशीर भोजनगृहांवर मुंबई पालिका अधिनियमनातील तरतुदींचे पालन न केल्याप्रकरणी योग्य ती कारवाई करण्यात यावी, आवश्यक परवान्याशिवाय बेकायदेशीरपणे चालणाऱ्या या खाद्यगृहांना सेवा दिल्याबद्दल या मोबाईल ॲप्सवरही फौजदारी कारवाई करून याची सखोल चौकशी करावी. तसेच या विक्रेत्यांना रस्त्याच्या कडेला अतिक्रमण करण्यापासून प्रतिबंधित करावं. त्यांना पुरविण्यात येणारा एलपीजी सिलिंडरचा पुरवठा रोखण्यात यावा. बिगर व्यावसायिक वाहनांचा वापर करणाऱ्या डिलिव्हरी कंपन्यांच्या अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणीही या याचिकेतून करण्यात आली आहे. या याचिकेवर सोमवारी न्यायमूर्ती अमजद सय्यद आणि न्यायमूर्ती अभय अहुजा यांच्यासमोर सुनावणी पार पडणार आहे.

कोरोना महामारीमुळे मुंबईत टाळेबंदी लागू करण्यात आली होती. त्यादरम्यान, सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद होती. फक्त फूड होम डिलिव्हरीला मूभा देण्यात आली होती त्यासाठी सर्वत्र स्विगी, झोमॅटो आणि डंझोचा वापर करण्यात येत होता. मात्र याच्या आडून अनेक ठिकाणी बेकायदेशीररित्या खाद्यपदार्थांची विक्री करणारी दुकानं थाटण्यात आली. त्याविरोधात इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशननं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. संघटनेच्या सदस्यांनी हॉटेल व्यवसाय उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवले असून अनिवार्य असलेले सर्व परवाने आणि नियमांचे पालन करून ते रेस्टॉरंट चालवतात. मात्र बेकायदेशीरपणे चालविण्यात येणाऱ्या या ठिकाणी विक्रेते अत्यंत अस्वच्छ परिस्थितीत आणि छोट्याशा जागेतून अन्न पुरवठा करतात. तसेच अन्न वितरणासाठी वापरण्यात येणारी वाहनं वैयक्तिक वापरासाठी नोंदणीकृत असतानाही त्यांचा व्यावसायिक कारणांसाठी वापर केला जात असल्याचं निदर्शनास आलंय, त्याबाबत वारंवार पालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणूनही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही, असा आरोप या याचिकेतून करण्यात आला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानपरिषदेत आज महत्त्वाचा ठराव; मुंबईतील 'या' रेल्वे स्थानकांची नावं बदलणार, करीरोडचं लालबाग होणार
विधानपरिषदेत आज महत्त्वाचा ठराव; मुंबईतील 'या' रेल्वे स्थानकांची नावं बदलणार
Raigad Rain : किल्ले रायगडावरील भयानक VIDEO, पावसाचं रौद्ररुप, पर्यटक पाण्याच्या लोंढ्यात अडकले
किल्ले रायगडावरील भयानक VIDEO, पावसाचं रौद्ररुप, पर्यटक पाण्याच्या लोंढ्यात अडकले
Marathi Movie Alyad Palyad Gaurav More : मराठी हॉरर कॉमेडीपटाची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई, गौरव मोरेच्या ‘अल्याड पल्याड-2’ ची घोषणा
मराठी हॉरर कॉमेडीपटाची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई, गौरव मोरेच्या ‘अल्याड पल्याड-2’ ची घोषणा
मद्यसाठा घेऊन जाणाऱ्या वाहनाचा पाठलाग करताना एक्साईजची स्कॉर्पिओ उलटली, एक कर्मचारी ठार, दोन पोलीस जखमी
मद्यसाठा घेऊन जाणाऱ्या वाहनाचा पाठलाग करताना एक्साईजची स्कॉर्पिओ उलटली, एक कर्मचारी ठार, दोन पोलीस जखमी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dombivali Platform Crowd : ट्रेनचा खोळंबा, डोंबिवलीच्या प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची तोबा गर्दीMumbai Heavy Rain : रस्ते वाहतुकीवर प्रचंड परिणाम,पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या लांब रांगाPun ST Bus Crowd : पावसाचा एक्सप्रेसला फटका, बससाठी प्रवाशांची मोठी गर्दीMumbai Rain:पावसाचा मंत्री आणि आमदारांना फटका; Amol Mitkari , Anil Patil थेट रेल्वे ट्रॅकवरुन निघाले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानपरिषदेत आज महत्त्वाचा ठराव; मुंबईतील 'या' रेल्वे स्थानकांची नावं बदलणार, करीरोडचं लालबाग होणार
विधानपरिषदेत आज महत्त्वाचा ठराव; मुंबईतील 'या' रेल्वे स्थानकांची नावं बदलणार
Raigad Rain : किल्ले रायगडावरील भयानक VIDEO, पावसाचं रौद्ररुप, पर्यटक पाण्याच्या लोंढ्यात अडकले
किल्ले रायगडावरील भयानक VIDEO, पावसाचं रौद्ररुप, पर्यटक पाण्याच्या लोंढ्यात अडकले
Marathi Movie Alyad Palyad Gaurav More : मराठी हॉरर कॉमेडीपटाची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई, गौरव मोरेच्या ‘अल्याड पल्याड-2’ ची घोषणा
मराठी हॉरर कॉमेडीपटाची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई, गौरव मोरेच्या ‘अल्याड पल्याड-2’ ची घोषणा
मद्यसाठा घेऊन जाणाऱ्या वाहनाचा पाठलाग करताना एक्साईजची स्कॉर्पिओ उलटली, एक कर्मचारी ठार, दोन पोलीस जखमी
मद्यसाठा घेऊन जाणाऱ्या वाहनाचा पाठलाग करताना एक्साईजची स्कॉर्पिओ उलटली, एक कर्मचारी ठार, दोन पोलीस जखमी
Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार, 56 बंधारे पाण्याखाली; राधानगरी तालुक्यात डोंगराची दरड कोसळून घरात
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार, 56 बंधारे पाण्याखाली; राधानगरी तालुक्यात डोंगराची दरड कोसळून घरात
Mumbai Rain Updates: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, पुढील तीन-चार तास मुसळधार पावसाचा इशारा, दीड वाजता समुद्रात मोठी भरती
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, पुढील तीन-चार तास मुसळधार पावसाचा इशारा, दीड वाजता समुद्रात मोठी भरती
लोकसभेला भाजपच्या लोकांनीही प्रणिती शिंदेंना मतदान केलं, सुशीलकुमार शिंदेंचा गौप्यस्फोट, विरोधात मतदान करणारे भाजपचे लोक कोण? 
लोकसभेला भाजपच्या लोकांनीही प्रणिती शिंदेंना मतदान केलं, सुशीलकुमार शिंदेंचा गौप्यस्फोट, विरोधात मतदान करणारे भाजपचे लोक कोण? 
Mumbai Rain Updates: मुंबईच्या पावसाचा आमदारांना फटका, मंत्र्यांना रेल्वे ट्रॅकवरून चालण्याची वेळ, अमोल मिटकरींचा व्हीडिओ व्हायरल
मुंबईतील मुसळधार पावसाने आपत्ती व्यवस्थापन-पुनवर्सन मंत्र्यांनाच 'रुळावर' आणलं, व्हीडिओ व्हायरल
Embed widget