2024 पर्यंत भारताला हिंदू राष्ट्र घोषित करणार : परमहंस आचार्य
लोकसंख्या नियंत्रण कायदा ,समान नागरी कायदा याची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी केंद्र सरकारकडे पत्राद्वारे केली आहे
भिवंडी : भाजप नेत्या नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सुरू झालेला मिटत नाही तोच आता अयोध्येतील तपस्वी छावणीच्या परमहंस आचार्य यांचं वादग्रस्त वक्तव्य समोर आलंय आपण कोणत्याही इसाई किंवा मुस्लिम व्यक्तीसोबत व्यवहार ठेवणार नाही असा संकल्प करण्याचं आवाहन परमहंस आचार्य यांनी भिवंडीतील हिंदू सभेतून केलंय. सोबतच 2024 पर्यंत हिंदू राष्ट्राची घोषणा होणार असल्याचाही दावा परमहंस आचार्य यांनी केलाय
आपण कोणाही इसाई अथवा मुस्लिम व्यक्ती सोबत व्यवहार नाही ठेवणार त्यांच्याकडून सामान खरेदी करणार नाही असा सर्व मिळून संकल्प करू असे वक्तव्य अयोध्या येथील तपस्वी छावणी पिठाधिश्वर जगद्गुरू परमहंस आचार्य यांनी भिवंडीत केले आहे. श्री समस्त हिंदू समाज भिवंडी द्वारा हिंदू जनजागरण पदयात्रा व राष्ट्रविरोधी जिहादी दहशतवादी मानसिकतेला विरोध करण्यासाठी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते
मुस्लिम समाजाशी कोणताही संबंध ठेवू नये, समान खरेदी करू नये आणि 2024 मध्ये देशाला हिंदू राष्ट्र घोषित करण्यसाठी पूर्ण ताकदीने सर्व मिळून प्रयत्न करू असे आवाहन करत सरकार सोबत आपलं बोलणं झाले आहे. पुढील आंदोलन या महाराष्ट्र भूमीत 7 नोव्हेंबर 2023 रोजी करणार व भारताला हिंदू राष्ट्र घोषित करणार असा संकल्प केला आहे. लोकसंख्या नियंत्रण कायदा ,समान नागरी कायदा याची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी केंद्र सरकारकडे पत्राद्वारे केली आहे. जे आडकाठी आणतील त्यांचा बंदोबस्त करण्याची तयारी आम्ही केल्याचा गर्भित इशारा त्यांनी दिला. जिहादी कारवाया लवकरात लवकर थांबवाव्या, असे देखील ते म्हणाले.
या जाहीर सभेपूर्वी प्रभू आळी गणपती मंदिर ते पारनाका झेंडा नाका - वाणी आळी - टिळक चौक - नझराना टॉकीज व तेथून छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेमध्ये हजारो नागरीक पावसाची तमा न बाळगता सहभागी झाले होते.