एक्स्प्लोर
Advertisement
ठाणे भाजपात येणे-जाणे, नारायण पवार इन, घाडीगावकर आऊट
ठाणे : महापालिका निवडणुकांच्या तोंडावर ठाणे भाजपमध्ये इनकमिंग-आऊटगोईंग सुरु आहे. भाजपच्या संजय घाडीगावकर यांच्यासह चार जणांनी भाजपला रामराम ठोकला आहे, तर काँग्रेसचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
ठाण्यामध्ये भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. भाजपच्या संजय घाडीगावकर यांच्यासह चौघांनी भाजपला रामराम ठोकला आहे. घाडीगावकर यांनी कुठल्याही पक्षात प्रवेश केला नाही ते स्वतंत्रपणे पॅनेल टाकून निवडणूक लढणार आहे. भाजपमध्ये तिकीटवाटपावरुन सेंटिग असल्याचा आरोप घाडीगावकरांनी केला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाणे भाजपची गोची झाली आहे.
शिवसेनेला कौरव म्हणून हिणवणाऱ्या भाजपमध्ये गुंडांचं इनकमिंग काही थांबायचं नाव घेत नाही. ठाण्यामध्ये आज काँग्रसचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
नारायण पवार यांच्यावर बिल्डरकडून खंडणी मागितल्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल झाला होता. त्यांनी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत ठाणे भाजप कार्यालयात त्यांचा भाजपप्रवेश झाला. पवार यांना काँग्रेसचं शहराध्यक्षपद मिळालं नसल्यानं ते नाराज होते. आता भाजप त्यांना कुठून उमेदवारी देते हे पाहणं महत्वाचं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
पुणे
निवडणूक
निवडणूक
Advertisement