एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
#MeToo प्रकरणात दोन्ही बाजू तपासणं गरजेचं : आदित्य ठाकरे
मी टूसारख्या प्रकरणात पोलीस आणि सगळ्यांचाच कल नेहमी एका बाजूने असल्याचं पाहायला मिळतं.
डोंबिवली : #MeToo सारख्या प्रकरणात दोन्ही बाजू तपासून पाहणं गरजेचं असून एकीकडे कल नसावा, असं मत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी व्यक्त केलं आहे. काल (16 ऑक्टोबर) डोंबिवलीत एका कार्यक्रमाला आदित्य ठाकरेंनी हजेरी लावली होती, यावेळी ते बोलत होते.
#MeToo : आरोपांची शहानिशा करुनच गुन्हा दाखल करावा, हायकोर्टात याचिका
मी टूसारख्या प्रकरणात पोलीस आणि सगळ्यांचाच कल नेहमी एका बाजूने असल्याचं पाहायला मिळतं. मात्र असं न होता दोन्ही बाजू तपासून पाहणं गरजेचं आहे. त्यात जे दोषी आढळतील, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, असं मत आदित्य ठाकरेंनी व्यक्त केलं.
आणि त्याने माझ्या पँटमध्ये हात घातला : साकिब सालेम
अक्षय कुमारसोबत युवासेना राज्यभरातल्या कॉलेज युवतींना सेल डिफेन्सचे धडे देत असून अशात एसएनडीटी युनिव्हर्सिटीत झालेला प्रकार निंदनीय असल्याचंही ते म्हणाले. तसंच या प्रकरणातल्या दोषींवर कारवाईची मागणी यावेळी आदित्य ठाकरेंनी केली.
#MeToo चं वादळ
अभिनेत्री तनुश्री दत्ता ने नाना पाटेकरांविरोधात आरोप केल्यानंतर #MeToo या चळवळीअंतर्गत देशभरातील विविध क्षेत्रातल्या महिलांनी आपल्यावर झालेले लैंगिक अत्याचार, गैरवर्तन यांच्याविषयी आवाज उठवायला सुरुवात केली आहे.
ज्येष्ठ अभिनेते आलोकनाथ यांनी 20 वर्षांपूर्वी बलात्कार केल्याचा गंभीर आरोप 'तारा' मालिकेच्या लेखिका-दिग्दर्शिका विनिता नंदा यांनी केला. कंगना रनौत, सोना मोहापात्रा, हिमानी शिवपुरी, सिमरन कौर सुरी, संध्या मृदुल, पूजा भट्ट, फ्लोरा सैनी, ज्वाला गुट्टा यांनीही आपली आपबिती मीडियासमोर सांगितली होती.
दिग्गज अभिनेते नाना पाटेकर, संस्कारी बाबूजी अलोकनाथ, गायक कैलाश खेर, शोमॅन सुभाष घई, अभिनेता विकी कौशलचे वडील म्हणजेच अॅक्शन दिग्दर्शक श्याम कौशल, दिग्दर्शक विकास बहल, लेखक चेतन भगत, अभिनेता रजत कपूर अशा अनेक जणांवर आरोप झाले आहेत. अगदी कॉमेडियन अदिती मित्तलवरही महिला कॉमेडियनने गैरवर्तनाचे आरोप केले. शक्ती कपूर, राहुल रॉय , सैफ अली खान यांनीही मीटू चळवळीवर मत व्यक्त केलं.
#MeToo चं वादळ त्यानंतर नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातही दाखल झालं. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यमंत्री एम जे अकबर यांच्यावर पत्रकार प्रिया रमानी यांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले. तर बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी यांच्यावरही लैंगिक शोषणाचा आरोप झाला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
राजकारण
Advertisement