एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
डॉक्टरांच्या संपामुळे 377 रुग्ण दगावले, वकिलांची हायकोर्टात माहिती
मुंबई: डॉक्टरांच्या संपामुळे राज्यभरात 377 रुग्ण दगावल्याची माहिती वकिलांनी मुंबई हायकोर्टात दिली. तसंच मुंबईत डॉक्टरांच्या संपकाळात उपचाराअभावी सरकारी रुग्णालयातील 181 रुग्ण दगावल्याचा दावाही वकिलांनी केला.
उपचाराअभावी रुग्णांचा अंत
दरम्यान, उपचाराअभावी बीएमसीच्या तीन रुग्णालयांमध्ये 135 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये केईएममधील 53,नायर 34 आणि सायन रूग्णालय 48 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती वकिलांनी दिली.
इतकंच नाही तर राज्यभरातील रुग्णालयातील 380 जणही उपचाराअभावी दगावल्याचा दावा, वकिलांनी केला.
राज्यभरातील रुग्णालयातील आकडेवारी
जेजे रूग्णालय - 32
जीटी- 5
सेंट जॉर्ज - 8
कामा -1
जीएमसी,मिरज - 35
वीएमएमसी,सोलापूर-26
जीएमसी,नागपूर - 18
वीएन जीएमसी,यवतमाळ-18
जीएमसी,अकोला - 23
जीएमसी,औरंगाबाद - 57
स्टार जीएमसी,अंबाजोगाई - 19
केईएम-53
नायर - 34
सायन - 48
मार्डचं प्रतिज्ञापत्र
दरम्यान, तर मार्डकडून संप मागे घेत असल्याचं प्रतिज्ञापत्र हायकोर्टात सादर करण्यात आलं. तसंच उद्या सकाळी 8 वाजल्यापासून कामावर रुजू होणार असल्याचं मार्डने हायकोर्टात सांगितलं.
ज्यांच्या पैशावर शिकता, त्यांना मरणाच्या दारात सोडू नका, मुख्यमंत्र्यांचा डॉक्टरांना सज्जड दम
जनतेच्या पैशातून सरकारी डॉक्टरांच्या शिक्षणाचा खर्च होतो. त्याच जनतेला तुम्ही मरणाच्या दारात सोडणार असाल तर ते आम्ही खपवून घेणार नाही. आज शेवटचं सांगतोय, हात जोडतो, कामावर परत या, शपथेला विसरु नका, देवाचा दर्जा दिलाय, दानव बनू नका, असा सज्जड दम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलक डॉक्टरांना दिला.
काय आहे प्रकरण?
सायन रुग्णालयातील डॉक्टर रोहित कुमार यांना रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकाडून मारहाण करण्यात आली. रविवारी संध्याकाळी हा प्रकार घडला. याप्रकरणी सायन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या घटनेचा निषेध म्हणून रविवार संध्याकाळपासून सायनसह नायर आणि केईएम रुग्णालयातील रुग्णसेवा बंद आहे. या रुग्णालयात सध्या केवळ अत्यावश्यक सेवा सुरु आहे. आज सकाळपासून राज्यभरातल्या सर्व निवासी डॉक्टरांनी बंद पुकारल्यानं रुग्णसेवा ठप्प पडली आहे. मार्डच्या डॉक्टरांच्या नेमक्या मागण्या काय? – डॉक्टरांवरील हल्ले टळण्यासाठी डॉक्टर्स प्रोटेक्शन अॅक्ट 2010ची परिणामकारक अंमलबजावणी करा – डॉक्टरांना मारहाण करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी – निवासी डॉक्टरांना सुरक्षित वातावरणात काम करता यावे यासाठी सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवा – सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावा संबंधित बातम्या मारहाणीची भीती वाटत असेल तर नोकरी सोडा : हायकोर्ट आडमुठ्या डॉक्टरांवर कारवाई करा : हायकोर्ट ज्यांच्या पैशावर शिकता, त्यांना मरणाच्या दारात सोडू नका, मुख्यमंत्र्यांचा डॉक्टरांना सज्जड दम ‘मार्ड’कडून संप मागे, डॉक्टरांना सेवेत रुजू होण्याचं आवाहन कोर्टाच्या आदेशानंतरही डॉक्टर लेखी आश्वासनासाठी अडून मुंबई हायकोर्टाने फटकारल्यानंतर निवासी डॉक्टरांचा संप मागे डॉक्टरांनो, तुम्हाला संरक्षण देऊ, पण समाजाला शिक्षा देऊ नका : मुख्यमंत्री मार्डचे डॉक्टर चौथ्या दिवशीही सामूहिक रजेवरअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement