एक्स्प्लोर

संसदेत IIM Mumbai बिल पास, या वर्षीच्या NITIE च्या सर्व मुलांना आयआयएम मुंबईचे सर्टिफिकेट

Indian Institutes of Management : मुंबईत आयआयएम संस्था सुरू होणार असून ही देशातील 21 वी आयआयएम असेल. 

IIM Mumbai : संसदेत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अमेंडमेंट बिल 2023 पास झालं असून त्यामुळे आता मुंबईतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग (NITIE) या संस्थेचं अधिकृत नाव आयआयएम मुंबई असं होणार आहे. मुंबईतील आयआयएम ही देशातील 21 वी आयआयएम संस्था असेल. त्यामुळे या संस्थेत सध्या शिकत असलेल्या जवळपास 1200 मुलांना या वर्षीपासून आयआयएम मुंबईचे सर्टिफिकेट मिळणार आहे अशी माहिती NITIE च्या प्रमुखांनी दिली आहे. 

NITIE मध्ये सध्या वेगवेगळ्या कोर्ससाठी 1200 मुले शिक्षण घेत असून त्या सर्वांना या वर्षीपासून IIM Mumbai चे सर्टिफिकेट मिळणार आहे. येत्या वर्षापासून आयआयएम मुंबईची प्रवेश क्षमता दुप्पट करण्यात येणार असून त्यासाठी आवश्य+क पायाभूत सुविधांचा विकास करण्यात येणार आहे. तसेच या संस्थेसाठी लागणारा अधिकचा स्टाफही भरून घेण्यात येणार आहे. 

मुंबईच्या पवईतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रिअल इंजिनिअरींग म्हणजेच नीटी या संस्थेलाच आता आयआयएम म्हणून मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता मुंबईतील आयआयएममध्ये एमबीएच्या जवळपास साडेतीनशे जागांसाठी प्रवेश दिला जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच आता देशातील 21 आणि महाराष्ट्रातील दुसरी आयआयएम शिक्षण संस्था म्हणून मुंबईच्या आयआयएमकडे पाहिलं जाणार आहे. 

आयआयएममध्ये शिकण्याचं अनेक विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं. त्यासाठी मग मुंबईतील विद्यार्थी राज्याबाहेरील आयआयएमच्या संस्थेत प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. पण केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे आता मुंबईतील विद्यार्थ्यांना मुंबईत आयआयएम मधून शिकण्याचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे. देशाची आर्थिक राजधानी असल्यानं मुंबई नेहमीच आयआयएमसारख्या टॉप मॅनेजमेंट संस्थेची गरज भासत होती. तसेच वेळोवेळी अनेक बड्या उद्योगपतींकडून आयआयएमसारख्या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेची मागणी करण्यात येते. यावर गांभीर्याने विचार करण्यासाठी केंद्र सरकारकडून हालचाली सुरु झाल्या होत्या आणि त्यानंतर आता हे महत्त्वाचं पाऊल टाकण्यात आलं आहे. 

मागील वर्षी फेब्रुवारी मध्येच पवईतील नीटी शिक्षण संस्थेला मुंबईचे आयआयएममध्ये रुपांतर करण्यासाठी पाच सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली होती. बीएसईचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अहालाबाद विद्यापीठाचे कुलगुरु आशिषकुमार चौहान यांची समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग (NITIE) मुंबई ही भारत सरकारने 1963 मध्ये स्थापन केलेली एक स्वायत्त संस्था आहे.

औद्योगिक अभियांत्रिकी, अभियांत्रिकी व्यवस्थापन आणि व्यवस्थापन विज्ञान क्षेत्रातील तरुणांना शिक्षण देण्याचे मोलाचे कार्य नाटी ही संस्था करत आहे.  तसेच विद्यार्थ्यांना देशाच्या आर्थिक विकासात योगदान देण्यासाठी त्यांचे भविष्य घडवण्याचे काम ही संस्था करत असते. IIM Mumbai म्हणजेच  इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या संस्थेच्या कायदाच्या कक्षेत येणार आहे.

ही बातमी वाचा: 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ashish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तरTeam India Victory Parade : चर्चगेट रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दीमुळे प्रवाशांचा श्वास गुदमरला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget