एक्स्प्लोर

मी मुख्यमंत्र्यांचा चाहता, उद्धव ठाकरेंकडूनही ऑफर: कोळंबकर

कालिदास कोळंबकर यांनी भाजपकडूनच नव्हे तर शिवसेनेकडूनही आपल्याला ऑफर असल्याचा दावा केला.

मुंबई: "मला केवळ भाजपतूनच नव्हे तर शिवसेनेतूनही ऑफर आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घरी परत येण्याचं आवाहन केलं आहे", असा दावा काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांनी केला. ते एबीपी माझाशी बोलत होते. नारायण राणे यांचे कट्टर समर्थक असलेले आमदार कालिदास कोळंबकर हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर एबीपी माझाने कोळंबकर यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. यावेळी कोळंबकर यांनी भाजपकडूनच नव्हे तर शिवसेनेकडूनही आपल्याला ऑफर असल्याचा दावा केला. कोळंबकर म्हणाले, “बीडीडी चाळ आणि माझ्या मतदार संघातील कामं मुख्यमंत्र्यांनी केली. मुख्यमंत्री विरोधीपक्षात होते, तेव्हापासून मी त्यांचा चाहता आहे. ते सरकारवर तुटून पडायचे. मुख्यमंत्री झाल्यावर ते सभागृहात बोलले कालिदास लोकांची काम घेऊन येतात, मी काम करणार” इतकंच नाही तर  काँग्रेसच्या लोकांनी त्यांच्या होर्डिंगवरुन माझे फोटो काढले, मग मी त्यांचे का लावू, असा सवाल कोळंबकर यांनी उपस्थित केला. कालिदास कोळंबकर यांनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देताना मुख्यमंत्र्यांसोबतचे होर्डिंग लावले होते. त्याबाबत अशोक चव्हाण यांनीही आपल्याला विचारल्याचं त्यांनी सांगितलं.  त्यावेळी मी त्यांना सांगितलं की माझी कामं मुख्यमंत्री करत आहेत, म्हणून पोस्टर्स लावले, असं कोळंबकर म्हणाले. कालिदास कोळंबकर भाजपच्या वाटेवर? काँग्रेस आमदार कालिदास कोळबंकर हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा पुन्हा रंगली आहे. बीडीडी चाळ पुनर्वसनाच्या कामात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतल्यापासून, कालिदास कोळंबकर हे  मुख्यमंत्र्यांच्या जवळ आहेत. यापूर्वीही कोळंबकर हे भाजपमध्ये जाण्याची चर्चा रंगली होती. ते सातत्याने मुख्यमंत्र्यांच्या कामाचं कौतुक करत आहेत. कोण आहेत कालिदास कोळंबकर? कालिदास कोळंबकर हे मुंबईतील वडाळा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार आहेत. ते सलग सात वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. काँग्रेसआधी ते शिवसेनेत होते. मात्र, राणेंसोबत ते काँग्रेसमध्ये आले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे ते कट्टर समर्थक मानले जातात. कट्टर राणे समर्थक कोळंबकर! नारायण राणे ज्यावेळी शिवसेनेतून बाहेर पडले, त्यावेळी जे आमदार राणेंसोबत काँग्रेसमध्ये आले, त्यामध्ये आमदार कालिदास कोळंबकरही होते. विशेष म्हणजे राणेंसोबत काँग्रेसमध्ये आलेले बहुतेक आमदार त्यांना सोडून गेले. स्वत: राणेही काँग्रेससोडून गेले. मात्र कोळंबकर तरीही काँग्रेसमध्ये राहून राणेंना पाठिंबा देत राहिले. ...तर अनेक कार्यकर्ते माझ्यासोबत भाजपमध्ये येतील : कोळंबकर “भाजपमध्ये जायचं असेल, तर अनेक कार्यकर्ते माझ्यासोबत येत आहेत आणि माझ्यामुळे पक्षाला किती फायदा होईल, याची जाणीव त्या पक्षाच्या नेत्यांना आहे.”, असे कोळंबकरांनी वर्षभरापूर्वी म्हटलं होतं. त्यादरम्यान राणेंनी काँग्रेस सोडली होती. संबंधित बातम्या  काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर भाजपच्या वाटेवर?  

सडेतोड कोळंबकर... वांद्र्याच्या निवडणुकीपासून राणेंच्या भाजपप्रवेशापर्यंत! 

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
कोणी हस्तक्षेप करुन कुणबी प्रमाणपत्र रद्द केली असतील तर त्यावर यंत्रणा बसवण्याचा विचार, जरांगेंच्या टीकेनंतर उदय सामंतांचं प्रत्युत्तर 
कोणी हस्तक्षेप करुन कुणबी प्रमाणपत्र रद्द केली असतील तर त्यावर यंत्रणा बसवण्याचा विचार, जरांगेंच्या टीकेनंतर उदय सामंतांचं प्रत्युत्तर 
धक्कादायक! तोल गेला हात निसटला, धावत्या लोकलमधून थेट खाली पडला, मुंबई फिरण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय युवकाचा  मृत्यू
धक्कादायक! तोल गेला हात निसटला, धावत्या लोकलमधून थेट खाली पडला, मुंबई फिरण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय युवकाचा  मृत्यू
Vasai News: हातात एक वर्षाची चिमुकली, स्कूटीवरून प्रवास; वाऱ्याने केस विस्कटले, आई केस बांधत असतानाच अनर्थ घडला, वसईतील काळीज पिळवटून टाकणारी घटना
हातात एक वर्षाची चिमुकली, स्कूटीवरून प्रवास; वाऱ्याने केस विस्कटले, आई केस बांधत असतानाच अनर्थ घडला, वसईतील काळीज पिळवटून टाकणारी घटना

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget