राजकारणी ते सेलिब्रेटी; मुंबईत धुळवडीची नेमकी कशी तयारी करण्यात आली आहे? जाणून घ्या
Holi Celebration 2023: राज्यभरात होळीचा उत्साह पाहायला मिळत असताना धुळवडीसाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. कोरोनामधल्या दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त होळी धुळवड साजरी होत आहे.
Holi Celebration 2023: राज्यभरात होळीचा उत्साह पाहायला मिळत असताना धुळवडीसाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. कोरोनामधल्या दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त होळी धुळवड साजरी होत असताना मोठा उत्साह धुळवडीनिमित्त (Holi 2023) राज्यभरात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे राजकीय सामाजिक आणि सेलिब्रिटी धुळवड या सणाच्या निमित्ताने मुंबईतल्या (Mumbai) विविध भागात पाहायला मिळेल. कशी तयारी मुंबईत (Mumbai) यासाठी करण्यात आली आहे, याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ..
होळीचा सण (Holi 2023) म्हणजे आनंद आणि रंगांची उधळण आणि याच रंगात नाहून निघण्यासाठी मुंबई (Mumbai) धुळवळीची विशेष तयारी करण्यात आली आहे. सेलिब्रेटीपासून ते राजकारणी ते अगदी सर्वसामान्य ही धूळवड साजरी करण्यासाठी मोठ्या उत्साहात सज्ज आहे. कुठल्या निर्बंधाविना ही धुळवड साजरी केली जात असल्याने तरुणांमध्ये विशेष उत्साह आहे.
Holi Celebration 2023: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अनेक ठिकाणी होळी धुळवड कार्यक्रमाला सहभागी राहणार
या धुळवडीच्या उत्साहात राजकारणीसुद्धा मागे नसून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अनेक ठिकाणी होळी धुळवड कार्यक्रमाला सहभागी राहणार असल्याची माहिती आहे. मुंबईतील भाजपची काही महत्त्वाचे नेते जुहू येथे धुळवड साजरी करणार आहेत. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, कृपाशंकर सिंह, मंगल प्रभात लोढा सर्वजण एकत्र धुळवड साजरी करण्यासाठी येतील. मुंबईला अनेक ठिकाणी सेलिब्रेटी सुद्धा धुळवड कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळतील. बॉलीवूड ग्रँड होळीचा आयोजन मुंबईतील अंधेरी लोखंडवाला सेलिब्रेशन क्लबमध्ये करण्यात आले आहे. यामध्ये देशातील टॉप डीजेच्या ट्रॅकवर बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटी थिरकताना पाहायला मिळतील. या कार्यक्रमाची प्रवेश शुल्क 50 हजारांपासून ते दोन लाखांपर्यंत असणार आहे.
Holi Celebration 2023: होळीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीसही सज्ज
होळी धूळवडीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) सुद्धा विशेष खबरदारी घेतली असून सुरक्षा दृष्टिकोनात नियोजन केलं आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी साध्या देशातील पोलीस तैनात असणार आहेत. ड्रंक अँड ड्राईव्ह तपासणी सुद्धा ठीक ठिकाणी पोलिसांकडून केली जाईल. त्यामुळे या धुळवडीला मोठ्या प्रमाणावर रंगांची उधळण करत राज्यभरात हा उत्साह पाहायला मिळणार आहे. त्यामुळे पर्यावरण स्नेही होळी आणि धुळवळीचा सण साजरा करून या सणाच्या एकमेकांना शुभेच्छा देऊया.
इतर महत्वाच्या बातमी: