एक्स्प्लोर
भिवंडीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रस्त्याचं उद्घाटन, मात्र वाहतुकीचा बोजवारा
आज रस्त्याच्या कामाचं उद्घाटन असलं तरी नाशिक, कल्याण, मुबंई, ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा प्रचंड सामना करावा लागतो.

भिवंडी : मुंबई-नाशिक महामार्गावर भिवंडीजवळ मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. गेल्या तीन तासांपासून इथे वाहनांच्या रांगा लागल्या असून शहरातही वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज नव्या रस्त्यांच्या विकासकामांचं उद्घाटन झालं. या कार्यक्रमामुळे भिवंडीत वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहेत. आज रस्त्याच्या कामाचं उद्घाटन असलं तरी नाशिक, कल्याण, मुबंई, ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा प्रचंड सामना करावा लागतो. कारण हा मार्ग महामार्ग जरी असला तरी काही ठिकाणी अरुंद आहे, त्यामुळे या मार्गावर नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. पोलिसांची सगळी कुमक मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आहे. परिणामी गोदामातून निघणारे कंटेनर आणि इतर वाहनांवर नियंत्रण नाही. सोबतच रस्त्याची आणि उड्डाणपुलाची कामं अर्धवट असल्याने आणखीच वाहतूक कोंडी झाली आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
महाराष्ट्र
सोलापूर























