एक्स्प्लोर

जान्हवी कुकरेजा हत्याकांड; मुख्य आरोपी श्री जोगधनकरचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळला

Janhavi Kujreja Murder Case : जान्हवी कुकरेजा हत्याकांड प्रकरणी मुख्य आरोपी श्री जोगधनकरचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळला आहे.

Janhavi Kujreja Murder Case : 31 डिसेंबर 2020 च्या रात्री मुंबईत घडलेल्या जान्हवी कुकरेजा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी श्री जोगधनकरचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावला आहे. न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्यासमोर यावर सुनावणी झाली. याप्रकरणात जान्हवीची बालमैत्रीण दिया पडळकर आणि जान्हवीचा प्रियकर श्री जोगधनकर यांच्यावर जान्हवीची हत्या केल्याचा आरोप आहे. मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपत्रात या दोघांनी मिळून जान्हवीची हत्या केल्याचा आरोप मुंबई पोलिसांनी केला आहे. ही हत्या झाली तेव्हा कोणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसला तरी न्यायवैद्यक अहवाल, पार्टीत उपस्थितांचे जबाब, त्यातून समोर आलेले परिस्थितीजन्य पुरावे आरोपींचा दोष सिद्ध करण्यास पुरेसे आहेत, असा दावा मुंबई पोलिसांनी केला आहे.

काय घडलं 'त्या' रात्री? 

19 वर्षीय जान्हवी कुकरेजा ही मानसशास्त्र शाखेची विद्यार्थिनी होती. खार येथील भगवती हाईट्स इमारतीच्या गच्चीवर तिच्या मित्रांनी थर्टा फर्स्टनिमित्तानं आयोजित केलेल्या पार्टीत ती आपली बालपणीची मैत्रीण दिया आणि प्रियकर श्री सोबत सहभागी झाली होती. तिथं उपस्थितांसह हे तिघेही त्यावेळी मद्याच्या नशेत होते. पार्टी दरम्यान आपला 23 वर्षीय प्रियकर श्री याला बालमैत्रिण दियासोबत नको त्या अवस्थेत पाहिल्यानंतर जान्हवी अस्वस्थ झाली. याच मुद्यावरून तिघांमध्ये इमारतीच्या जिन्यावर जोरदार वाद झाला. त्यानंतर इमारतीच्या पाचव्या मजल्यावर तिघांमध्ये कडाक्याचे भांडण सुरू झालं. अचानक श्री, दिया यांनी मिळून जान्हवीला अमानुष मारहाण सुरू केली. आणि त्यातच जान्हवीचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर केलेल्या तपासणीत जान्हवीच्या शरीरावर मारहाणीच्या, फरफटत नेल्याच्या आणि भिंतीवर आपटल्याच्या एकूण 48 जखमा आढळल्या.

मुंबई पोलिसांनी याप्रकरणी एकूण 74 साक्षीदारांच्या जबानी या आरोपपत्रात नोंदवल्या आहेत. यात न्यायवैद्यक प्रयोग शाळेतील 10 तज्ञांचेही जबाब असून त्यांनी केलेल्या विविध चाचण्यांचे अहवालही जोडलेले आहेत. ही घटना घडण्याआधी श्री, दियासोबत जिन्यावरून खाली उतरताना, गच्चीवर जान्हवीला रडताना आणि आरोपी दियाला तिची जखम साफ करताना पाहिल्याचं काहींनी म्हटलं आहे. तसेच घटनेनंतर मुख्य आरोपी श्री रक्ताळलेल्या कपड्यांनी इमारतीबाहेर पडतानाचे सीसीटीव्ही चित्रणही पोलिसांनी आरोपपत्रात जोडलेलं आहे. मात्र आपण जिन्यात धडपडल्याचं सांगत श्रीनं सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात तर दियाने हिंदुजा रुग्णालयात उपचार घेतले होते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केलेKonkan Rain Special Report : नॉनस्टॉप पावसानं कोकणतल्या अनेक जिल्ह्यांना धुतलंHit and Run Case Special Report : बड्या बापांच्या पोरांची नशा कधी उतरणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
Embed widget