मध्य रेल्वेच्या हार्बर लाइनवरचा 38 तासांचा मेगाब्लॉक आज संपणार, दुपारी 1 नंतर बेलापूर ते पनवेल दरम्यान मार्ग सुरळीत होण्याची शक्यता
Harbour Line Mega Block: मेगाब्लॉक दरम्यान बेलापूर (Belapur) आणि पनवेल (Panvel) स्थानकांमधील वाहतूक (सोमवारी) दुपारी 1 नंतर सुरू होणार आहे.

38 Hour Harbour Line Mega Block: हार्बर मार्गावर (Harbour Line) घेण्यात आलेला 38 तासांचा मेगाब्लॉक (Mega Block) आज दुपारी एक वाजता संपणार आहे. या मेगाब्लॉक दरम्यान बेलापूर (Belapur) आणि पनवेल (Panvel) स्थानकांमधील वाहतूक (सोमवारी) दुपारी 1 नंतर सुरू होणार आहे. 38 तासांचा ब्लॉक संपल्यानंतर पुढचे पाच दिवस ( 2 ते 6 ऑक्टोबर) रात्री ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. रात्रीचा मेगाब्लॉक घेण्यात येणार असला तरी वाहतूक मात्र सुरळीत राहणार आहे.
मालवाहतुकीसाठी समर्पित असणाऱ्या 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'च्या कामासाठी हार्बर मार्गावर 38 तासांचा ब्लॉक घेण्यात आला. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या दोन नवीन अप आणि डाऊन मार्गिकांच्या बांधकामाबरोबरच पनवेल उपनगरीय रिमॉडेलिंग कामासाठी बेलापूर-पनवेलदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक घेण्यात आला. काम अंतीम टप्प्यात असून दुपारी 1 वाजल्यापासून हार्बर मार्गावरील वाहतूक सुरळीत होणार आहे.
पनवेल येथे लोकल यार्डात स्टॅबलिंग मार्गिका क्रमांक 1, 2, 3, 4 आणि 10 च्या कामासाठी 2 ते 6 ऑक्टोबरपर्यंत दररोज मध्यरात्री 12.30 ते पहाटे 5.30 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. या पाच दिवसांच्या ब्लॉककालावधीत लोकल सेवा रद्द असणार आहे. पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षिततेसाठी मेगाब्लॉक घेण्यात आला होता. मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
2 ते 6 ऑक्टोबर लोकल वेळापत्रक
शेवट लोकल
- सीएसएमटी पनवेल रात्री 10.58 वाजता
- ठाणे-पनेवल लोकल रात्री 11.32 वाजता
- पनवेल-ठाणे लोकल रात्री 10.15 वाजता
पहिली लोकल
- ठाणे-पनेवल लोकल सकाळी 6.20 वाजता
- पनवेल-सीएसएमटी लोकल पहाटे 5.40 वाजता
- पनेवल-ठाणे लोकल सकाळी 6.13 वाजता
कोकणात जाणारी एक लाईन सुरु
काल संध्याकाळी पनवेल जवळ मालगाडीचे डब्बे घसरुन तब्बल 24 तासांहून अधिक काळ उलटले तरी अजूनही कोकणात जाणारे दोन्ही मार्ग सुरळीत झालेले नाहीत.. मुंबईतून कोकणात जाणारी एक लाईन सुरु झालीय विविध स्थानकात रखडलेल्या तुतारी एक्सप्रेस, मंगळूरु एक्सप्रेस, मडगाव एक्सप्रेस हळूहळू मार्गस्थ होत आहे तर कोकण रेल्वे मार्गावरील कोकणातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाड्या 13 ते 16 तास उशिराने धावत आहेत. कोकणात येणाऱ्या 12 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत.
हे ही वाचा :
मुंबईकरांसाठी मोठी बातमी, CNG 3 रुपयांनी तर PNG 2 रुपयांनी स्वस्त, आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
