Gunaratna Sadavarte : मी पण राम मंदिराच्या आंदोलनात होतो, त्यामुळे मलाही निमंत्रण आलंय, पण..., गुणरत्न सदावर्तेंनी अयोध्येत न जाण्याचं सांगितलं कारण
Gunaratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते यांना देखील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण आल्याचं त्यांनी सांगितलं आहे. पण ते या सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचं देखील म्हटलं.
मुंबई : राम मंदिराच्या (Ram Mandir) आंदोलनात मी पण होतो. त्यामुळे या सोहळ्याचं निमंत्रण मलाही आलं आहे. परंतु जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मुंबईत येणार आहेत, त्या संदर्भात उद्या उच्च न्यायालयात सुनावणी आहे. त्यामुळे मला अयोध्येला जाता येणार नाही, अशी प्रतिक्रिया गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी दिली. राम मंदिराच्या आंदोलनात मी आणि जयश्री पाटील होतो. कारसेवकांची बाजू घेतली त्यामुळे कोर्टाने 22 तारखेला सुट्टी रद्द करण्याची याचिका करण्याची मागणी हायकोर्टानं फेटाळली, असं देखील सदावर्तेंनी म्हटलं.
सरकारने जी सुट्टी जाहीर केली होती, त्याला कोणतीही स्थगिती नाही - सदावर्ते
आयेध्येत रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना होत आहे. पण हे होऊ नये, सुट्टी मिळू नये यासाठी कम्युनिस्ट पक्षाच्या लोकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यामध्ये काही आक्षेपार्ह नव्हतं. राम मंदिर प्रकरणात मी आणि जयश्री पाटील देखील होतो. कारसेवकांची बाजू त्यांनी घेतली होती. त्यामुळे आम्ही त्यांची बाजू घेतली आणि कोर्टाने ही मागणी फेटाळून लावली. जी सुट्टी जाहीर केली, त्याला कोणतीही स्थगिती दिली नाही. रामलल्लाच्या पूजेसाठी सर्वांना सुट्टी जाहीर केलीय, त्यावर शिक्कामोर्तब झालं, असं सदावर्ते म्हणालेत.
उद्या उच्च न्यायालयात सगळे मुद्दे उपस्थित केले जातील - सदावर्ते
मनोज जरांगे पाटील यांची पायी दींडी ही मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झालीये. पण मराठा आंदोलनाला विरोध करणारी याचिका जयश्री पाटील यांनी दाखल केली होती. तसेच जरांगे पाटील हे मुंबईत सुरु करणाऱ्या आंदोलनाच्या संदर्भात देखील उच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. त्यासंदर्भात देखील सर्व मुद्दे उपस्थित केले जातील, अशी माहिती गुणरत्न सदावर्ते यांनी दिली.