Greta Thunberg toolkit case: निकीता जेकबला हायकोर्टाचा दिलासा, अटकेला तीन आठवड्यांसाठी स्थगिती
शेतकरी आंदोलनाला समर्थन देऊन ते कशाप्रकारे वाढवता येईल यासाठी एक टूककिट तयार करण्यात आलं होतं. ग्रेटा थुलबर्ग यांनी ट्विटरवर एक टूलकिट शेअर केले होतं. हे टूलकिट निकीता जेकब आणि शंतनू यांनी समाजमाध्यमांवर शेअर केल्याचं तपासात समोर आलं आहे.
मुंबई : ग्रेटा थानबर्ग टूल किट प्रकरणातील आरोपी निकिता जेकबला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. कोर्टाने निकिताच्या अटकेला तीन आठवड्यांसाठी स्थगिती दिली आहे. 25 हजारांच्या वैयक्तिक बाँडवर ही सवलत देण्यात आली आहे. सुनावणीदरम्यान कोर्टाने कबूल केले की निकिताचा कोणताही राजकीय, धार्मिक किंवा आर्थिक अजेंडा नाही. 11 फेब्रुवारीला निकिताच्या घराची झडती घेतली असता काही सामान जप्त केले. संबंधित गुन्हा दुसर्या राज्यात घडला आहे, म्हणून हे प्रकरण त्यांच्या कार्यक्षेत्रात नाही, असंही उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
समांतर वास्तविकता आणि निरीक्षणाच्या आधारे औरंगाबाद खंडपीठाने आरोपींना अंतरिम दिलासा दिला आहे, अशी कोर्टाची नोंद आहे. याचिकाकर्त्याला दिलासा व अर्जासाठी मुदत द्यावी, अशी मागणी वकील मिहिर देसाई यांनी केलेली विनंती न्यायालयाने मान्य केली.
टूलकिट प्रकरणात सातवं नाव समोर; अनिता लाल पोलिसांच्या रडारवर
निकीतावर काय आरोप आहेत?
केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात मागील अडीच महिन्यापासून नवी दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. यामध्ये समाजातील अनेक घटकांकडून समर्थन आणि दिल्लीत हिंसाही झाली आहे. आंतरराष्ट्रीय पर्यावरणप्रेमी ग्रेटा थुलबर्ग यांनी ट्विटरवर एक टूल किट शेअर केले होते. यामध्ये आंदोलनाला समर्थन देऊन ते कशाप्रकारे वाढवता येईल यावर विविध प्रकारे रुपरेषा देण्यात आली आहे. यामध्ये ट्विटरवर मोठी चळवळ सुरु करणे, भारतीय दूतावासाबाहेर आंदोलन छेडणे, अधिकाधिक समर्थन मिळवणं इत्यादी बाबींचा समावेश आहे. मात्र हे टूलकिट जेकब आणि शंतनू यांच्याकडून समाजमाध्यमांवर शेअर केल्याचं तपासात समोर आलं आहे. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी निकीतासह शंतनू नावाच्या व्यक्तीविरोधात विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं आहे. त्यानंतर तातडीने सोमवारी सकाळी निकीता जेकब यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला आहे. "मी सर्वधर्म समभाव मानते आणि सामाजिक शांततेवर माझा विश्वास आहे. मला नाहक यात अडकवले जात असून सोशल मीडियावर माझ्यावर टीका केली जात आहे," असा दावा या याचिकेत केलेला आहे. शनिवारी पोलिसांनी याच प्रकरणी दिशा रवी या बंगळूरमधील एका 22 वर्षीय तरुणीलाही अटक केली आहे.
संबंधित बातम्या