एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
ठाणे, नवी मुंबई, पुण्यातील भारनियमन मागे
कोळसा उपलब्ध नसल्याने आणि विजेचा वापर वाढल्यामुळे राज्यात 5 ऑक्टोबरपासून तातडीचं भारनियमन लागू करण्यात आलं.
![ठाणे, नवी मुंबई, पुण्यातील भारनियमन मागे Government Call Back Load Shading Of Thane Navi Mumbai ठाणे, नवी मुंबई, पुण्यातील भारनियमन मागे](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/10/06103807/load-shedding.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : लोकांच्या टीकेनंतर धास्तावलेल्या राज्य सरकारने शहरी भागातील भारनियमन मागे घेतलं आहे. मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई, नाशिक आणि पुणे भागातील लोडशेडिंग मागे घेण्यात आलं आहे.
ज्या शहरांमध्ये वीजचोरीचे आणि वीजबिल बुडवण्याचे प्रमाण कमी आहे, अशा शहरांमध्ये लागू केलेलं भारनियमन मागे घेतल्याची माहिती महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे संचालक विश्वास पाठक यांनी दिली आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे शहरी भागातील नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. परंतु असं असलं तरी 2100 मेगावॅटचा तुटवडा कायम असल्याने ग्रामीण भागातील भारनियमन कायम राहणार आहे.
ठाणे, नवी मुंबईसह महानगरांत भारनियमन सुरु
कोळसा उपलब्ध नसल्याने आणि विजेचा वापर वाढल्यामुळे राज्यात 5 ऑक्टोबरपासून तातडीचं भारनियमन लागू करण्यात आलं. दीड ते दोन हजार मेगावॅटची तूट असल्याने महावितरणने हा निर्णय घेतला आहे.
ऐन ऑक्टोबर हिटमध्ये हा निर्णय घेतल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. सरकारच्या या निर्णयावर जोरदार टीका झाली. सोशल मीडियावरही सरकारला अक्षरश: झोडपून काढलं. यानंतर धास्तावलेल्या सरकारने शहरी भागातील भारनियमन रद्द केलं.
ऐन ऑक्टोबर हिटमध्ये महावितरणचा चटका, तातडीचं भारनियमन लागू
अर्थात हा दिलासा तात्पुरता असून, भविष्यात गरज पडल्यास हे भारनियमन पुन्हा लागू करण्याचे संकेतही महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाने दिले आहेत.
दरम्यान, 700 मेगा वॅट वीज विकत घेतल्याची माहिती सरकारने दिली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)