Gold rates | सोन्याच्या दरात घसरण; लग्नघरांमध्ये दागिने खरेदीची लगबग
Gold rates सोनं आणि चांदीच्या वाढत्या दरांनी काही दिवसांपूर्वी विक्रमी आकडा गाठला होता. ज्यानंतर आता पुन्हा एकदा सोन्याचे दर कमी होण्यास सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे.

Gold rates सोनं आणि चांदीच्या वाढत्या दरांनी काही दिवसांपूर्वी विक्रमी आकडा गाठला होता. ज्यानंतर आता पुन्हा एकदा सोन्याचे दर कमी होण्यास सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचे दर कमीजास्त प्रमाणात उतरत असून, आता या दरांनी मागील 10 महिन्यांतील सर्वात कमी दरांचा आकडा गाठला आहे.
एकिकडे कोरोनाकाळ आणि लॉकडाऊनमुळं सोन्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात आल्यामुळं दरांनी विक्रमी उंची गाठली होती. पण, आता मात्र आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये होणारी उलथापालथ पाहता हे दर कमी होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
बुधवारी सोन्याचे दर 46 हजार 850 रुपये प्रतितोळा इतक्यावर पोहोचल्याचं पाहायला मिळालं. मुंबईत या दरांनी 45,370 रुपये प्रतितोळा इतका आकडा गाठला. सोन्याचे हे दर पाहता मागील 10 महिन्यांमधील हे सर्वात कमी आकडे असल्याची बाब निदर्शनास आली आहे.
भारतातून मिळणारं प्रेम पाहून पाकिस्तानातील 'पावरी गर्ल' म्हणते...
लग्नघरांमध्ये दागिने खरेदीसाठी लगबग
सोन्याच्या दरांमध्ये होणारी घसरण पाहता सध्याच्या घडीला अनेक लग्नघरांमध्ये सोनं- चांदीच्या दागिन्यांची खरेदी करण्यासाठीची लगबग पाहायला मिळत आहे. दरांचे हे आकडे सर्वसामान्यांच्या खिशाला दिलासा देणारे ठरत असल्यामुळं दागिने खरेदीसाठी सराफांच्या दुकानांमधील ये-जाही वाढली आहे. आता हे दर आणखी कमी होतात की, सध्याच्याच परिस्थितीवर टिकून राहतात हे येत्या दिवसांमध्येच स्पष्ट होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
