Girgaon CP Tank Fire : गिरगाव सीपी टँक परिसरातील बंद बंगल्याला आग, बंगला जळून खाक
Mumbai Girgaon Fire : ही आग मोठी असली तरी त्यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. हा बंगला बंद असल्याने दुर्दैवी प्रकार टळला.

मुंबई: गिरगाव परिसरात सीपी टँक जवळ एका बंद बंगल्याला मोठी आग लागल्याची घटना घडली. रविवारी संध्याकाळी 5.15 च्या सुमारास ही आग लागली. घटनेची माहिती मिळतात अग्निशमन दलाचा चार गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या आणि तब्बल अर्धा तासानंतर या आगीवर नियंत्रण मिळवले.
सीपी टँक जवळ असलेला हा बंगला बंद असल्यामुळे सुदैवाने त्यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र संपूर्ण बंगला जळून खाक झाला आहे. ही आग कशामुळे लागली या संदर्भात अधिक तपास अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक पोलीस करत आहेत.
चार दिवसांपूर्वीही मुंबईत आग
चार दिवसांपूर्वीही मुंबईतील डोंगरी परिसरात एक मोठी आग लागली होती. 24 मजली टॉवर अन्सारी हाईट्सला ही आग लागली होती. त्यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी इमारतीचे काही प्रमाणात नुकसान झालं.
24 मजली टॉवर अन्सारी हाईट्स ही एक रहिवासी इमारत आहे. या इमारतीमध्ये मोठा संख्यामध्ये लोक राहतात. आगीची माहिती मिळतात पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सर्व जणांना सुखरूप बाहेर काढले. आगीच्या घटनेवेळी वरच्या मजल्यावरील लोकांना सुरक्षित गच्चीवर ठेवण्यात आलं. सुदैवाने या आगीमध्ये जीवितहानी झाली नाही. मात्र घरातील सामान जळून खाक झाले आहे.
या आगीनंतर अरूंद गल्यामध्ये अग्निसुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून केलेल्या अनधिकृत बांधकामांवर येत्या दोन महिन्यांत कारवाई करणार असल्याचं महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
ही बातमी वाचा:























