कोरोना काळात वापरलेल्या हॅडग्लोव्ह्जचा पुनर्वापर करून विकणारी टोळी गजाआड, 50 लाखांचा मुद्देमाल जप्त
नवी मुंबईत आलेला हॅन्डग्लोव्ह्जचा पुरवठा औरंगाबाद, भिवंडी येथून झाला असल्याची माहिती दिली होती. क्राईम ब्रान्च टीमने औरंगाबादमध्ये जाऊन तपास केला असता तिथे 19 टन तर भिवंडी येथे 15 टन साठा सापडला.
![कोरोना काळात वापरलेल्या हॅडग्लोव्ह्जचा पुनर्वापर करून विकणारी टोळी गजाआड, 50 लाखांचा मुद्देमाल जप्त gang arrested selling used hand-gloves during the Corona period, 50 lakh Stock seized navi mumbai कोरोना काळात वापरलेल्या हॅडग्लोव्ह्जचा पुनर्वापर करून विकणारी टोळी गजाआड, 50 लाखांचा मुद्देमाल जप्त](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/09/03033700/WhatsApp-Image-2020-09-02-at-9.17.45-PM.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी मुंबई : कोरोना काळात वापरून टाकलेले नायट्राईल हॅण्डग्लोव्ह्जचा पुनर्वापर करणारी टोळी नवी मुंबई पोलीसांनी जेरबंद केली आहे. नवी मुंबई बरोबर औरंगाबाद, बंगळुरु, कोचिन येथून पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत आरोपींकडून 50 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गेल्या आठवड्यात नवी मुंबईतील पावणे एमआयडीसीमधून 4 टन हॅन्डग्लोव्ह्जचा साठा जप्त केल्यानतंर याचे धागेदोरे कोचिन, बंगळुरुपर्यंत गेले आहेत. कोरोना काळात वापरून फेकून दिलेल्या नायट्राईल हॅन्डग्लोव्ह्जचा पुनर्वापर करणारी टोळीला नवी मुंबई क्राईम ब्रान्चने बेड्या ठोकल्या आहेत. क्राईम ब्रान्च अधिकारी राहुल राख यांना खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनंतर छापा टाकला असता 4 टन जुने हॅण्डग्लोव्ह्जचा साठा पकडण्यात आला होता.
यातील आरोपी प्रशांत सुर्वे याला अटक केली असता नवी मुंबईत आलेला हॅन्डग्लोव्ह्जचा पुरवठा औरंगाबाद, भिवंडी येथून झाला असल्याची माहिती दिली होती. क्राईम ब्रान्च टीमने औरंगाबादमध्ये जाऊन तपास केला असता तिथे 19 टन तर भिवंडी येथे 15 टन साठा सापडला. अधिक तपासामध्ये जुन्या हॅण्डग्लोव्ह्जचा माल बंगळुरु, कोचिन, हैदराबाद येथून आल्याची माहिती मिळाली.
जुन्या हॅण्डग्लोव्ह्जला धुवून परत विकणाऱ्या टोळीचे धागेदोरे दक्षिण भारतात मिळाले आहेत. बंगळुरु, हैदराबाद, कोचिन येथे छापा टाकत एकूण 48 टन हॅण्डग्लोव्हजचा साठा जप्त करण्यात आला आहे. वॉशिंग मशीन, ड्रायर्स, ब्लोअर असा 50 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान नवी मुंबईतून हॅण्डग्लोव्हज सप्लायर प्रशांत सुर्वे यांनी ज्या कंपनीला हॅन्डग्लोव्ह्ज पुरवले होते, ते जप्त करण्याचे काम सुरू आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)