एक्स्प्लोर

Mumbai Police Ganesh Visarjan : अनंत चतुर्दशीसाठी मुंबई पोलिसांचा तगडा बंदोबस्त, लालबाग-परळमधील मिरवणुकीसाठी विशेष व्यवस्था

Mumbai Police Ganesh Visarjan : गुरुवारी होणाऱ्या गणेश विसजर्नासाठी मुंबई पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे. लालबाग-परळसाठी विशेष पोलीस व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

मुंबई :  गुरुवारी 28 सप्टेंबर रोजी होणाऱ्या अनंत चतुर्दशीसाठी (Ananta Chaturdashi) मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. पोलिसांच्या वैद्यकीय रजा वगळता इतर सर्व सुट्ट्या रद्द करण्यात आल्यात आहेत. गणेश विसर्जनाला (Ganesh Visarjan) कोणत्याही प्रकारे गालबोट लागू नये यासाठी पोलिसांकडून मोठा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. त्याशिवाय, मुंबईत होमगार्डस, विविध स्वयंसेवी संस्था, पोलीस मित्रांची मदतदेखील होणार आहे. लालबागच्या राजाच्या विसर्जनाला (Lalbaugcha Raja Visarjan) यंदाही मोठी गर्दी होणार असल्याचा अंदाज आहे. त्यासाठीदेखील मुंबई पोलिसांकडून लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी विशेष बंदोबस्त असणार आहे. 

मुंबई असा असणार पोलीस बंदोबस्त 

मुंबई पोलीस दलाकडून 8 अप्पर पोलीस आयुक्त, 25 पोलीस उपायुक्त, 45 सहायक पोलीस आयुक्त यांच्यासह 2866 पोलीस अधिकारी आणि 16,258 पोलीस अंमलदार बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेले आहेत.

त्यांच्या सोबत महत्वाच्या ठिकाणी 35 एसआरपीएफ पलटन, क्यूआरटी पथक, दंगल नियंत्रण पथक, होमगार्डस् देखील बंदोबस्तासाठी असणार आहेत.

मुंबईतील गिरगांव, दादर, जुहू, मार्वे, अक्सा या प्रमुख विसर्जन स्थळांसह 73 नैसर्गिक ठिकाणांव्यतिरिक्त 160 हून अधिक कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्या प्रत्येक ठिकाणी कायदा व सुव्यस्थेच्या दृष्टीने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.

प्रत्येक विसर्जनाची ठिकाणे सीसीटीव्ही निगराणीखाली असून प्रमुख विसर्जनाच्या ठिकाणी ध्वनीक्षेपक यंत्रणेसह तात्पुरते नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेले आहे. तसेच वाहतूक पोलीस विभागाकडून वाहतूकीचे योग्य नियमन करणेकरीता चोख उपाययोजना करण्यात आली आहे. 

त्याचबरोबर 29 सप्टेंबर रोजी "ईद-ए-मिलाद" सण साजरा करण्यात येणार असून त्या निमित्ताने मुंबई शहरात विविध ठिकाणी मिरवणुकांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या वेळी कायदा व सुव्यवस्था राखणेकामी देखील चोख पोलीस बंदोबस्ताचे आयोजन करण्यात आलेले आहे.

लालबाग-परळ परिसरातील गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मुंबई पोलिसांची व्यवस्था

मुंबईतील उत्सवाचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरणगावात विसर्जनाच्या दिवशी मोठी गर्दी उसळते. ही बाब लक्षात घेता लालबाग-परळ भागात गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मुंबई पोलिसांनी विशेष व्यवस्था केली आहे. केवळ लालबाग-परळ भागात 300 सीसीटीव्हींची सोय केली आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी सहा छेडछाडविरोधी पथक तैनात करण्यात आले आहेत. मोबाईल चोरांवर लक्ष ठेवण्यासाठी 6 विशेष पथके असणार आहेत. 

तर, दहशतवादी विरोधी पथकाची एक टीमदेखील तैनात असणार आहे. संशयास्पद वस्तू आढळल्यास त्याच्या तपासणीसाठी 3 बॉम्बनाशक पथकेदेखील तैनात असणार आहेत. 

त्याशिवाय, तीन दंगल नियंत्रण पथक, राज्य राखीव पोलिसांची 5 पथके, तीन सीसीटीव्ही व्हॅन, 2500 पोलीस मित्र कार्यकर्ते, सहा वॉच टॉवरची व्यवस्था करण्यात आली आहे. 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

AC Local : मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार, 19 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर 12 एसी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या, 3 नॉन एसी लोकल नव्यानं  सुरु  
मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार, 19 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर 12 एसी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
IND vs PAK : भारतासाठी पाकिस्तानचा कोणता खेळाडू धोकादायक ठरणार? मॅच कोण जिंकणार, हरभजन सिंग म्हणाला...
भारतासाठी पाकिस्तानचा कोणता खेळाडू धोकादायक ठरणार? मॅच कोण जिंकणार, हरभजन सिंग म्हणाला...
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड

व्हिडीओ

Special Report Manoj Jarange On Protest : जरांगेंचा पुन्हा एल्गार,आंदोलनाआधी सरकारच्या हालचाली सुरु?
Special Report Pune Kalakar Katta : पुण्यातला कलाकार कट्टा हटवणार?; भाजपच्या नगरसेवकांची मागणी
Special Report MVA : मविआची मैत्री सेट तरच 'रेड कार्पेट'; Uddhav Thackeray विधान परिषदेवर जाणार?
Narhari Zirwal Special Report झिरवळांच्या कार्यालयात क्लार्कला 35 हजारांची लाच स्विकारताना अटक
NCP Merge Special Report शशिकांत शिंदेंच्या लेखामध्ये काय?,राष्ट्रवादीचं विलिनीकरण कुठे अडलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AC Local : मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार, 19 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर 12 एसी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या, 3 नॉन एसी लोकल नव्यानं  सुरु  
मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार, 19 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर 12 एसी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
IND vs PAK : भारतासाठी पाकिस्तानचा कोणता खेळाडू धोकादायक ठरणार? मॅच कोण जिंकणार, हरभजन सिंग म्हणाला...
भारतासाठी पाकिस्तानचा कोणता खेळाडू धोकादायक ठरणार? मॅच कोण जिंकणार, हरभजन सिंग म्हणाला...
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
डंपरच्या धडकेत भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू, मोबाईलवर बोलत होता चालक, जमावाकडून तोडफोड
डंपरच्या धडकेत भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू, मोबाईलवर बोलत होता चालक, जमावाकडून तोडफोड
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
IND vs PAK : पाकिस्तान विरुद्ध अर्शदीप सिंगला खेळवू नका, नामिबियाच्या फलंदाजांनी धुलाई केल्यानं सुनील गावस्कर नाराज,  'या' खेळाडूचं नाव सूचवलं 
पाकिस्तान विरुद्ध अर्शदीप सिंगला खेळवू नका, सुनील गावस्कर यांचा सूर्यकुमार यादवला सल्ला, कोणाचं नाव सूचवलं?
मोठी बातमी! रोहित पवारांची मागणी, केंद्रीयमंत्र्यांनी लावली AAIB चौकशी, अजित पवारांच्या विमान अपघाताचे पत्ते उलगडणार
मोठी बातमी! रोहित पवारांची मागणी, केंद्रीयमंत्र्यांनी लावली AAIB चौकशी, अजित पवारांच्या विमान अपघाताचे पत्ते उलगडणार
Embed widget