सुरक्षा नियम पाळा अन्यथा पुन्हा ऑनलाईन सुनावणी सुरु करु; मुंबईतील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर न्यायमूर्तींचा इशारा
न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी यासंदर्भात नुकतच एक सूचनापत्र मुंबई उच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलं आहे. कोविड 19 बाबत प्रशासनानं आखून दिलेल्या सुरक्षातत्वांचे पालन होत नसल्याबद्दल न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
![सुरक्षा नियम पाळा अन्यथा पुन्हा ऑनलाईन सुनावणी सुरु करु; मुंबईतील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर न्यायमूर्तींचा इशारा Follow safety rules or start online hearing again Judges warn against rising corona outbreak in Mumbai सुरक्षा नियम पाळा अन्यथा पुन्हा ऑनलाईन सुनावणी सुरु करु; मुंबईतील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर न्यायमूर्तींचा इशारा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/10/27124912/Mumbai-highcourt01.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मुंबईतील कोरोना संसर्गाचा धोका पुन्हा वाढत असताना मुंबई उच्च न्यायालयानं देखील याची गंभीर दखल घेतली आहे. हायकोर्टात जर सोशल डिस्टन्सिंग आणि इतर सुरक्षा नियमावलीचं चोख पालन केलं नाही, तर पुन्हा ऑनलाईन सुनावणीचा पर्याय निवडला जाईल, असा थेट इशारा न्यायालयातील न्यायमूर्तींनी दिला आहे.
न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी यासंदर्भात नुकतच एक सूचनापत्र मुंबई उच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलं आहे. कोविड 19 बाबत प्रशासनानं आखून दिलेल्या सुरक्षातत्वांचे पालन होत नसल्याबद्दल न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हायकोर्टात सुनावणीसाठी उपस्थित राहणाऱ्या सर्व पक्षकारांनी या सुरक्षातत्वांचे काटेकोरपणे पालन करायला हवं. न्यायालयात ज्यांची सुनावणी असेल त्यांनीच प्रवेश करावा आणि सर्व नियम पाळावे, असे स्पष्ट आदेश या सूचनापत्रात दिले आहेत. जर या सुरक्षातत्वांचे पालन होताना दिसत नसेल तर तत्काळ प्रत्यक्ष सुनावणी बंद करून पुन्हा ऑनलाईन सुनावणी पूर्णवेळ सुरु करण्यात येईल, असा इशाराच न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी दिला आहे.
मागील वर्षी एप्रिल ते डिसेंबरपर्यंत हायकोर्टात ऑनलाईन सुनावणी सुरू होती. त्यानंतर टप्या टप्प्यात प्रत्यक्ष कामकाज सुरू करण्यात आलं. यासाठी स्वतंत्र नियमावलीही जाहीर केली असून हायकोर्टात कायन मास्क वापरणंही बंधनकारक आहे. सध्या हायकोर्टात केवळ शुक्रवारी काही कोर्टानं ऑनलाईन सुनावणी होत असते.
महत्त्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)