एक्स्प्लोर
VIDEO: उल्हासनगरमध्ये भरदिवसा गोळीबार, दृश्य सीसीटीव्हीत कैद

उल्हासनगर: व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुमीत चक्रवर्ती यांच्या कार्यालयावर आज दुपारी गोळीबार करण्यात आला आणि याची गोळीबारीची सीसीटीव्ही दृश्यं आता समोर आली आहेत. या गोळीबारामुळं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सुरेश पुजारीच्या हस्तकानी गोळीबार केला असण्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. दोन इसमांनी हेल्मेट घालून गोळीबार केला. यावेळी कार्यालयातून आलेल्या एका हल्लेखोरानं हेल्मेट काढल्याचं सीसीटीव्हीत स्पष्ट दिसतं आहे. सुदैवानं या गोळीबारात कुणीही जखमी झालेलं नाही. मिळालेल्या प्राथमिक माहितीच्या आधारे पोलिसांनी हल्लेखोरांचा तपास सुरु केला आहे. VIDEO
आणखी वाचा























