एक्स्प्लोर
मुंबईतील अंधेरीमध्ये प्रिंटींग प्रेसला आग, एकाचा मृत्यू
मुंबईतल्या आग लागण्याच्या मालिकेत एक नवी भर पडली आहे. अंधेरीच्या मरोळ परिसरातल्या मित्तल इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये इंडिया वन या प्रिंटींग प्रेसला काल (बुधवार) रात्री आग लागल्याची घटना घडली.

मुंबई : मुंबईतल्या आग लागण्याच्या मालिकेत एक नवी भर पडली आहे. अंधेरीच्या मरोळ परिसरातल्या मित्तल इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये इंडिया वन या प्रिंटींग प्रेसला काल (बुधवार) रात्री आग लागल्याची घटना घडली. या आगीत एकाचा होरपळून मृत्यू झाला आहे. प्रिंटींग प्रेसच्या आजूबाजूला जागा नसल्याने लोकांची बाहेर पडण्यासाठी पळापळ झाली. यामध्येच प्रदीप विश्वकर्मा आत अडकून पडले आणि त्यांना आपला जीव गमवावा लागला. फायर ब्रिगेडच्या 5 गाड्या आणि 5 पाण्याच्या टँकरच्या मदतीनं बऱ्याच वेळाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
भारत























