एक्स्प्लोर
'मोजोस बिस्ट्रो मधल्या शेगडीमुळेच कमला मिल्स कंपाऊंडमध्ये अग्नितांडव'
कमला मिल्स अग्नितांडवप्रकरणी अग्निशमन दलाचा अहवाल समोर आला आहे. या अहवालात अग्निशामन दलाने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. मोजोस बिस्ट्रोमधल्या शेगडीमुळेच ही आग लागल्याचं अग्निशमन दलाने आपल्या अहवालात नमूद केलं आहे.
मुंबई : कमला मिल्स अग्नितांडवा प्रकरणी अग्निशमन दलाचा अहवाल समोर आला असून, या अहवालात मोजो पबमधील शेगडीमुळे ही आग लागल्याचे नमूद करण्यात आलं आहे.
अग्निशनम दलाच्या अहवालानुसार, सुरुवातीला शेगडीत पेटलेल्या कोळश्यामुळे ही आग लागली. या आगीमुळे मोजोस बिस्ट्रोमधील पडद्यांनी पेट घेतला. त्यानंतर या आगीचे लोण वाढत गेले, आणि रुफ टॉपवर असलेल्या वन अबव्हचा ताबाही आगीनं घेतला.
मुंबईच्या लोअर परळ येथील कमला मिल्स कम्पाऊंडमधील हॉटेलला 29 डिसेंबर रोजी रात्री 12.30 च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. मृतांमध्ये 11 महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे.
ही आग लागली त्यावेळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते. कुणालाही काही कळायच्या आतच आगीने रौद्ररुप धारण केलं आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं.
दरम्यान, या घटनेनंतर ही आग शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत होता. पण आता अग्निनशमन दलाच्या अहवालात या आगीसाठी मोजेस पबमधील शेगडी जबाबदार असल्याचं सांगण्यात येत आहे.
संबंधित बातम्या
कमला मिल घटनेदिवशी माझ्यावर नेत्यांकडून दबाव : बीएमसी आयुक्त
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement