मुंबई: मानखुर्दमधील भंगाराच्या गोदामांना आग; कोणतीही जीवितहानी नाही
Mankhurd fire : भंगाराच्या गोदामांना आग लागल्याची माहिती समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली.
मुंबई: मानखुर्द येथील न्यू मंडाला भागात आज पहाटे 3.21 वाजण्याच्या सुमारास भंगारांच्या गोदामांना आग (Mankhurd Fire) लागली. पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना (Mumbai Fire Brigade) मोठे प्रयत्न करावे लागले. सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवण्यास यश आले. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. एकही जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.
भंगाराच्या गोदामांना आग लागल्याची माहिती समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 13 फायर इंजिन, 12 वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले.
मानखुर्द येथील आगीत जवळपास 15 गोदामांचे नुकसान झाल्याची माहिती मुंबई महापालिकेचे एम/पूर्व प्रभागाचे सहाय्यक आयुक्त महेंद्र उबाळे यांनी दिली असल्याचे वृत्त 'हिंदुस्तान टाइम्स'ने दिले. गोदामे असलेले जमीन ही जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीत आहे. ही जागा गोदामांना भाडेतत्वावर देण्यात आली आहे.
आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर कुलिंग ऑपरेशन राबवण्यासाठी काही तासांचा अवधी लागला. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. गोदामात असलेल्या भंगारातील वस्तूंमुळे ही आग लागली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सुदैवाने या आगीमुळे मोठी दुर्घटना घडली नाही. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, गोदामातील अनेक वस्तू जळून खाक झाल्या.
दिल्लीतही आग
दिल्लीतील कडकड्डूमा मेट्रो स्थानकाजवळील ऋषभ टॉवरला अचानक आग लागली. इमारतीच्या सहाव्या मजल्यावरही आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 14 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
इतर बातमी:
Anil Deshmukh : अनिल देशमुखांच्या ईडी कोठडीत वाढ, देशमुख म्हणाले, ईडी कोठडीत छळ सुरु!
Kangana Ranaut Statement : कंगना रनौतचा राष्ट्रीय पुरस्कार परत घ्या; संजय राऊतांची मागणी