एक्स्प्लोर

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! वैद्यकीय आणि सार्वजनिक आरोग्य विभागात साडेपंधरा हजार जणांची भरती होणार

वैद्यकीय आणि सार्वजनिक आरोग्य विभागात साडेपंधरा हजार जणांची भरती होणार : मंत्री दत्तात्रय भरणे.आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी आणि वरीष्ठ अधिकारी यांचे सेवानिवृत्तीचे वय आता 62 वर्ष करण्यात आलंय.

मुंबई : कोरोना संकट काळात वैद्यकीय आणि सार्वजनिक आरोग्य विभागात साडेपंधरा हजार जणांची भरती करणार असल्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सामान्य प्रशासन मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिली आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग यांना पदभरतीच्या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे. यात गट अ ते गट क या विभागातील एकूण 15 हजार 511 पदे ही लवकरच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणार असल्याचं मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. 

गेल्या काही वर्षापासून ही प्रक्रिया रखडली होती. या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. 

  • यामध्ये गट अ ची 4 हजरा 417 पदे
  • गट ब ची 8 हजार 31 पदे
  • गट कची 3 हजार 63 पदे 

अशी एकूण 15 हजार 511 पदे भरण्यास वित्त विभागाने सन 2018 पासून मान्यता दिलेली आहे. त्याअनुषंगाने या पदांचे आरक्षण तपासून पद भरती गतीने राबवण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे. उमेदवारांच्या मुलाखतीच्या टप्प्यावर प्रलंबित असलेली भरती प्रक्रिया पार पाडण्याच्या दृष्टीने एमपीएससी सदस्यांची 4 रिक्त पदे भरणे गरजेचे आहे. सदस्यांची ही पदे भरण्यासाठी जुलै अखेरपर्यंत सर्व प्रक्रिया पार पाडण्याबाबतचे निर्देश देण्यात आले आहेत.


आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी आणि वरीष्ठ अधिकारी यांचे सेवानिवृत्तीचे वय आता 62

सार्वजनिक आरोग्य विभागातील आरोग्य सेवा संचालनालय आणि राज्य कामगार विमा योजेनतील महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ मधील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय 60 वरून 62 करण्याचा निर्णय आज मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. तसा प्रस्ताव आज आरोग्य विभागाकडून कॅबिनेटमध्ये मांडला आला. याआधीही वयोमर्यादा सुरुवातीला 58 होती मग ती 60 करण्यात आली आणि आता 62 वर जात आहे. सध्याची परिस्थिती राज्याला अधिकाऱ्यांची असलेली गरज लक्षात घेता हा निर्णय घेत असल्याचं कळतंय. या निर्णयामुळे अनेक अधिकारी वर्गाला तसेच राज्याच्या आरोग्य सेवेला फायदा होणार आहे. याआधी 60 वयोमर्यादा करण्याचा निर्णय 31 मे 2015 ला करण्यात आला होता. त्यानंतर जवळपास 5 वर्षांनी पुन्हा हा निर्णय घेण्यात येतोय.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष रुग्ण, रुग्णालये आणि शासन यांना एकत्र आणणारे व्यासपीठ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष रुग्ण, रुग्णालये आणि शासन यांना एकत्र आणणारे व्यासपीठ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Mumbai Drug : सहा कोटींच्या एक्स्टसी गोळ्यांसह ‘ड्रग्ज क्वीन’ अटकेत; अश्विनी पॉलचे भांडे फुटले, रॅकेटही पोलिसांच्या टप्प्यात
सहा कोटींच्या एक्स्टसी गोळ्यांसह ‘ड्रग्ज क्वीन’ अटकेत; अश्विनी पॉलचे भांडे फुटले, रॅकेटही पोलिसांच्या टप्प्यात
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू
नगरसेवकांचे मासिक मानधन 1 लाख रुपये करा, समाजवादी पक्षाच्या नगरसेविकेची महापौरांकडे मागणी
नगरसेवकांचे मासिक मानधन 1 लाख रुपये करा, समाजवादी पक्षाच्या नगरसेविकेची महापौरांकडे मागणी

व्हिडीओ

Parth Pawar On Baramati Bypoll : बारामतीत मुद्दाम काही लोकांना उभा केला, पार्थ पवार यांचा मोठा आरोप
Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arvind Kejriwal : दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात केजरीवालांना धक्का; न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा माघार न घेण्यावर ठाम
दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात केजरीवालांना धक्का; न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा माघार न घेण्यावर ठाम
IPS Transfer : राज्यातील नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल
राज्यातील नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल
Mahesh Shinde : एकनाथ शिंदेंच्या सभेत आमदार महेश शिंदेंना मोठा धक्का, कोरेगावचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे भाजपमधून शिवसेनेत दाखल
कोरेगावच्या माजी नगराध्यक्षांनी आमदार महेश शिंदेंची साथ सोडली, राजाभाऊ बर्गेंच्या हाती कमळाऐवजी धनुष्यबाण
कायद्यात भाषेची सक्ती नाही, गुणरत्न सदावर्तेंचा रिक्षाचालकांच्या मराठी भाषा सक्तीला विरोध; आयुक्तांना निवेदन
कायद्यात भाषेची सक्ती नाही, गुणरत्न सदावर्तेंचा रिक्षाचालकांच्या मराठी भाषा सक्तीला विरोध; आयुक्तांना निवेदन
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू
Female CM India: काँग्रेस आणि भाजप, कोणत्या राज्यात कोणत्या पक्षानं मुख्यमंत्री पदावर महिलांना दिली संधी?
काँग्रेस आणि भाजप, कोणत्या राज्यात कोणत्या पक्षानं मुख्यमंत्री पदावर महिलांना दिली संधी?
बनावट जातप्रमाणपत्र, नॉट रिचेबल सहर शेख माध्यमांसमोर; म्हणाल्या, आरोप बिनबुडाचे, वानखेडेतील फोटोवरही स्पष्टीकरण
Video: बनावट जातप्रमाणपत्र, नॉट रिचेबल सहर शेख माध्यमांसमोर; म्हणाल्या, आरोप बिनबुडाचे, वानखेडेतील फोटोवरही स्पष्टीकरण
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 एप्रिल 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 एप्रिल 2026 | सोमवार
Embed widget