एक्स्प्लोर

CJI Surya Kant : सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या ऐवजी पदवीदान सोहळ्यास नवे पाहुणे, अखेर TISS नं निर्णय बदलला 

CJI Surya Kant : टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसनं मोठा निर्णय घेतला आहे. पदवीदान सोहळ्याचे प्रमुख पाहुणे बदलण्याचा निर्णय TISS नं घेतला आहे. 

TISS मुंबई : टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसकडून 86 व्या समारंभास म्हणजेच पदवीदान सोहळ्यासाठी नव्या प्रमुख पाहुण्यांची निवड केली आहे. TISS कडून यापूर्वी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत (Surya Kant) यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलं होतं. मात्र, अखेर टाटा मेमोरिअल हॉस्पिटलचे संचालक डॉ. सी.एस. प्रमेश यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलं आहे. आता TISS चा पदवीदान सोहळा 22 ऑगस्टला होणार आहे.

TISS चा पदवीदान सोहळा नव्या पाहुण्यांसह  

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसकडून 86 व्या पदवीदान सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून सरन्यायाधीश सूर्यकांत यांना आमंत्रित केलं होतं. मात्र, हा कार्यक्रम 2 ऑगस्टला होणार होता. मात्र, ऐनवेळी पदवीदान सोहळा लांबणीवर टाकण्यात आला होता. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसकडून दोन दिवस अगोदर सोहळा लांबणीवर टाकण्यात आला होता. त्यावेळी TISS कडून त्यावेळी पदवीदान सोहळा आयोजित करण्यासाठी योग्य वातावरण नसल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यावेळी सरन्यायाधीशांच्या दौऱ्याला होणाऱ्या संभाव्य विरोधाची शक्यता आणि सुरक्षा व्यवस्थेसंदर्भातील कारणांचा उल्लेख करण्यात आला होता.  

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसकडून सांगण्यात आलं होतं की त्यावेळी दीक्षांत समारंभ आयोजित केला असता तर विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, पाहुणे आणि इतर लोकांच्या सुरक्षेचा मुद्दा निर्माण होण्याची शक्यता होता.  आता TISS नं नव्यानं जारी केलेल्या पदवीदान सोहळ्याच्या आमंत्रण पत्रिकेत प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सी.एस. प्रमेश यांचं नाव देण्यात आलं आहे.  

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसकडून प्रमुख पाहुणे म्हणून सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं नाव प्रमुख पाहुणे पदावरुन बदलल्यासंदर्भात अधिक माहिती देण्यात आलेली नाही. दीक्षांत समारंभ स्थगित झाल्यानं पदवीधर विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये नाराजी होती. काही विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी प्रवासासाठी नियोजन केलं होतं. TISS नं त्या निर्णयामुळं ज्यांच्यावर परिणाम झाला होता, त्यांना आर्थिक सहाय्य दिलं जाईल, असं स्पष्ट केलं होतं.

दरम्यान, सरन्यायाधी सूर्यकांत यांना हैदराबादच्या NALSAR येथील विद्यार्थ्यांनी देखील पदवीदान सोहळ्यास आमंत्रित करण्यास विरोध केला होता. त्यानंतर बार काऊन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा यांनी सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांची वकील म्हणून नोंदणी करण्यास स्थगिती देणारा आदेश काढला होता. त्यावरुन वाद निर्माण होताच तो निर्णय बदलून विद्यार्थ्यांची माफी मागण्याची वेळ मनन कुमार मिश्रांवर आली होती. हैदराबादनंतर बंगळुरुमध्ये देखील विद्यार्थ्यांनी पदवीदान सोहळ्यास सरन्यायाधीश सूर्यकांत यांना आमंत्रित करण्यास विरोध दर्शवला आहे.

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CJI Surya Kant : सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या ऐवजी पदवीदान सोहळ्यास नवे पाहुणे, अखेर TISS नं निर्णय बदलला 
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या ऐवजी पदवीदान सोहळ्यास नवे पाहुणे, अखेर TISS नं निर्णय बदलला 
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच बोलले; तोंडभरून कौतुक करत म्हणाले...
तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच बोलले; तोंडभरून कौतुक करत म्हणाले...
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
Narendra Dabholkar and Sachin Andure: मोठी बातमी: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन, जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती
मोठी बातमी: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन, जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापला, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापला, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Embed widget