एक्स्प्लोर
कर्जाच्या आमिषाने मुंबईत शेतकऱ्यांची लूट, युनिक ग्रुपचे प्रमुख फरार
मुंबई : बोरीवली पश्चिमेला असलेल्या ओम श्री साई दर्शन या इमारतीच्या तळमजल्यावर युनिक ग्रुप अँड कंपनीचं कार्यालय आहे. सध्या हे कार्यालय पोलिसांनी सील केलं आहे. कारण कुठल्याही कटकटीशिवाय कर्ज देण्याचं आमिष दाखवून सागर भोसले आणि मंगेश नावाच्या दोन व्यक्तींनी महाराष्ट्रातील शेकडो शेतकऱ्यांना गंडा घातला आहे.
मंगेश आणि सागरच्या भूलथापांना शेतकरी बळी पडले त्याचं कारण कार्यालयातला झगमगाट. नोकर-चाकर आणि मोठमोठ्या रकमांचे व्यवहार. एकीकडे शेतकऱ्यांना बँका उभ्या करत नाहीत, आणि दुसरीकडे इतकं सहजपणे कर्ज मिळत असेल तर काय हरकत आहे? असं म्हणत शेतकऱ्यांनी विश्वास ठेवला.
सागर आणि मंगेशची मोडस ऑपरेंडी भारी होती. आधी कर्जासाठी शेतीचे सातबारे, पॅनकार्ड, आधार कार्ड जमा करायचं. मग कर्ज मंजूर झाल्याचं सांगायचं. आणि प्रोसेसिंग फी म्हणून आरटीजीएसनं शेतकऱ्यांकडून लाखो रुपये आपल्या खात्यात जमा करायचे.
शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला, मात्र मंगेश आणि सागर भोसले मात्र फरार झाले आहेत. युनिक ग्रुपच्या माध्यमातून गावखेड्यात राहणाऱ्या शेकडो शेतकऱ्यांना गंडा घातल्याचा संशय आहे. पोलिसांनी पीडित शेतकऱ्यांना पोलिसात तक्रार करण्याचं आवाहन केलं आहे. बँकांमध्ये कर्ज घेण्यासाठी मनस्ताप होत असेल तरी शेतकऱ्यांनी अशा बोगस कंपन्यांपासून सावध राहण्याची गरज आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement