एक्स्प्लोर
Advertisement
इंजिनीअर तरुणाची आत्महत्या, पोलीस अत्याचाराचा आणखी एक बळी?
पोलिसांकडून चोरीच्या खोट्या आरोपात गोवून मारहाण आणि नंतर प्रकरण मिटवण्यासाठी पैशांची मागणी केल्यानं वैफल्यग्रस्त होऊन मितेश जगताप नावाच्या २२ वर्षीय ऑटोमोबाईल इंजिनीअरनं राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
मुंबई : अनिकेत कोथळेचं प्रकरण ताजं असतानाच महाराष्ट्रात पोलिसांकडून झालेल्या अत्याचारात आणखीन एक बळी गेल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांकडून चोरीच्या खोट्या आरोपात गोवून मारहाण आणि नंतर प्रकरण मिटवण्यासाठी पैशांची मागणी केल्यानं वैफल्यग्रस्त होऊन मितेश जगताप नावाच्या २२ वर्षीय ऑटोमोबाईल इंजिनीअरनं राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
आपल्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी पुष्पा जगताप यांनी अनेक बड्या अधिकाऱ्यांचे उंबरठे झिजवले मात्र, कुणीच ऐकेना म्हणून अखेरीस त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात यासंदर्भात याचिका दाखल केली. हायकोर्टानं ही याचिका दाखल करुन घेत टिटवाळा पोलिसांना ४ आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.
या याचिकेत पीएसआय गणपत सुळे, हवालदार अनिल राठोड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे आणि पोलीस निरीक्षक राजेश खोपकर यांना मितेशच्या आत्महत्येसाठी जबाबदार ठरवलं आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
२० ऑगस्टला रोजच्याप्रमाणे रात्रीच्या वेळेस मित्रांना भेटण्यासाठी गेलेल्या अनिकेतला टिटवाळा पोलिसांनी ताब्यत घेतलं. त्याच्यावर नंबर प्लेट नसलेली चोरीची बाईक वापरल्याचा आरोप ठेवला. मुळात ती बाईक मितेशचीच आहे हे पटवनू देण्यासाठी त्याचे वडील गाडीची सर्व कागदपत्र घेऊन पोलीस स्टेशनला गेले. पोलिसांनी त्या रात्री मितेशचं जॅकेट आणि मोबाईल कोणताही पंचनामा न करता जबरदस्ती ठेऊन घेतलं. त्यानंतर २२ आणि २३ ऑगस्टला त्याला पुन्हा पोलीस स्टेशनला बोलावून मारहाण करण्यात आली.
मितेशच्या घरच्यांनी पोलीस स्टेशन गाठताच पोलीस मितेशकडे ५० लाखांच्या घरफोडीची चौकशी करत असल्याचं समजलं. मात्र, कोणतंही आरोपपत्र दाखल न करता पोलिसांनी मितेशला इतकं मारलं की त्याचं तोंड सुजून लाल झालं, घरी परतताना त्याला नीट चालताही येत नव्हतं. अश्यातच मितेश २३ ऑगस्टच्या रात्री जेवून आपल्या खोलीत झोपायला गेला आणि त्यानं पंख्याला लटकून आत्महत्या केली.
या घटनेची माहिती मिळताच टिटवाळा पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी जाऊन मितेशची बॉडी ताब्यात घेतली. रातोरात त्याचं शवविच्छेदन आटपून जबरदस्ती जगताप कुटुंबीयांना मितेशवर अंत्यसंस्कार करण्यास भाग पाडल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी हे प्रकरण दाबण्यासाठी जगताप कुटुंबीयांना २० लाख रुपये देण्याची तयारी दाखवली असा आरोपही या याचिकेत करण्यात आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement