एक्स्प्लोर
Advertisement
विधानपरिषद पोटनिवडणुकीत युतीच्या प्रसाद लाड यांची बाजी
काँग्रेस आणि राष्ट्रवादीची 9 मतं फुटल्याचं समजतं आहे. त्यामुळे पक्षाला दगा देणारे आमदार कोण, याची काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गोटात जोरदार चर्चा सुरु आहे.
मुंबई : विधानपरिषद पोटनिवडणुकीत शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार प्रसाद लाड हे विजयी झाले आहेत, त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप माने यांचा पराभव केला. प्रसाद लाड यांना 209 मतं, दिलीप माने यांना 73 मतं मिळाली, तर दोन मतं बाद झाली आहेत.
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणेंनी विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर त्या जागेसाठी आज निवडणूक पार पडली.
वाचा : भाजप उमेदवार प्रसाद लाड यांची नेमकी संपत्ती किती?
विशेष म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची 9 मतं फुटल्याचं समजतं आहे. त्यामुळे पक्षाला दगा देणारे आमदार कोण, याची काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गोटात जोरदार चर्चा सुरु आहे.
नारायण राणे समर्थक कालिदास कोळंबकरांनी काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान न केल्याचं उघडपणे जाहीर केलं. दरम्यान, छगन भुजबळ आणि अर्जुन खोतकर यांना मतदान करता आलं नाही. राज्यात पहिल्यांदाच विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी नोटाचा पर्याय वापरण्यात आला होता.
प्रसाद लाड यांची राजकीय कारकीर्द
– राष्ट्रवादीत असताना अजित पवारांचे विश्वासू
– राष्ट्रवादीत असताना पक्षाचे सरचिटणीस म्हणून काही काळ काम
– म्हाडाच्या अध्यक्षपदीही काही काळ नेमणूक
– भाजपची सत्ता आल्यावर विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीविरोधात अपक्ष म्हणून लढले
– या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी मदत केली, तरीही पराभव
– पराभवानंतर भाजपमध्ये प्रवेश, मुंबई उपाध्यक्षपदी नेमणूक
– मुख्यमंत्र्यांचे विश्वासू म्हणून ओळख
प्रसाद लाड यांची नेमकी संपत्ती किती?
- जंगम मालमत्ता : 47 कोटी 71 लाख रुपये :
- स्थावर मालमत्ता : 55 कोटी 86 लाख :
- विधानपरिषद पोटनिवडणुचं मतदन संपलं, पाच वाजता मतमजोणी,
- MIM च्या दोन आमदारांची मतदानाला दांडी, तर छगन भुजबळ, अर्जुन खोतकर मतदानासाठी अपात्र
- कोर्टाकडून छगन भुजबळ यांना परवानगी न मिळाल्याने ते मतदान करणार नाहीत
- एमआयएम आमदार विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीत मतदान करणार नाही, आमदार वारिस पठाण आणि इमियाज जलील यांची मतदानाला दांडी
- शिवसेना आमदारांवर उद्धव ठाकरे यांचा विश्वास नाही, त्यामुळेच प्रसाद लाड यांचे पोलिंग एजंट म्हणून मिलिंद नार्वेकरांना विधानभवनात बसवलं, राष्ट्रवादीचा तिरकस टोला
- विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनाच तिसरा डोळा, पोलिंग अजेंट म्हणून मिलिंद नार्वेकर यांचं जातीने लक्ष, क्रॉस व्होटिंग होऊ नये म्हणून शिवसेनेचा पवित्रा
- आतापर्यंत भाजपच्या 102, शिवसेनेच्या 51, राष्ट्रवादीच्या 36 आणि काँग्रेसच्या 32 आमदारांचं मतदान
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही मतदानाचा हक्क बजावला
- पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांचं पहिलं मतदान
भाजप उमेदवार प्रसाद लाड यांची नेमकी संपत्ती किती?
संपूर्ण घटनाक्रम : ... आणि प्रसाद लाड यांच्या नावाची घोषणा झाली!
विधानपरिषद पोटनिवडणूक : राणेंचा पत्ता कट, प्रसाद लाड यांना उमेदवारी
काँग्रेसचे विधानपरिषद उमेदवार दिलीप माने यांच्याविरोधात गुन्हा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement