सफाई कर्मचा-यांच्या मुलांचा परदेशातील शिक्षणाचा खर्च महापालिका करणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा
Eknath Shinde, Mumbai : "मुंबई महापालिका सर्व सुविधा उपलब्ध असणाऱ्या देशातील पालिकांपैकी एक आहे. क्वालिटी आणि कॅान्टीटीमध्ये काहीच तडजोड नाही."
Eknath Shinde, Mumbai : "मुंबई (Mumbai) महापालिका सर्व सुविधा उपलब्ध असणाऱ्या देशातील पालिकांपैकी एक आहे. क्वालिटी आणि कॅान्टीटीमध्ये काहीच तडजोड नाही. मुंबईचा हिरो सफाई कर्मचारी आहे.त्यामुळे सफाई कर्मचा-यांच्या मुलांच्या परदेश शिक्षणाचा खर्च पालिका करणार आहे", अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली. ते मुंबईत बोलत होते.
एकनाथ शिंदे म्हणाले, 10 हजार कोटी पेक्षा जास्तीचे प्रकल्प कधीच झाले नव्हते. राज्यात आता 2 लाख कोटींचे प्रकल्प मुंबई मनपात सुरु आहेत. मनपाच्या जीवावर इतर लोकांनी खर्च केला. आंचारसंहिता कघीही लागेल म्हणुन कार्यक्रम लवकरात लवकरात करतोय. मी कॅालेज मधील सर्व ठिकाणी फिरलोय. नायर हॅास्पिटलचे हे कॅालेज 5 star हॅाटेल पेक्षा कमी नाहीये. ॲापरेशन कसे करतात हे देखील मी आता बघितले. मी पण ॲापरेशन केलेत. डॅाक्टरेट मला मिळण्याआधीच मी ॲाप्रेशन केलेत, असंही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी यावेळी बोलताना नमूदं केले.
पुढे बोलताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, लोकांना आता मुंबईत खड्डे बघायला मिळणार नाहीत. आम्ही प्रदुषण मुक्त मुंबई करणार आहोत. ग्रीन कव्हर तयार करणार आहोत. शिवाय मॅन मेड फॅारेस्ट तयार करण्याची तयारी सुरु आहे. 200 एकरमध्ये जागतीक दर्जाचे उद्यान बनवतोय. रेस कोर्समध्ये घोडे पळायचे आता मुलं पळतील. गार्डन शहरांची फुप्फुस आहेत. एक मोठे सेंट्रल पार्क होईल.
झिरो प्रिस्क्रिपशन हॅास्पिटल केलेत
झिरो प्रिस्क्रिपशन हॅास्पिटल केलेत. केईएमला गेलो होतो तेव्हा 3 वॅार्ड बंद होते आता ते सुरु केलेत 360 बेड वाढतील. घरी बसून काही कळत नाही फिल्डवर जावे लागते. झिरो प्रिस्क्रिपशन केले आणि 3 हजार कोटी रुपयांची औषधे फ्री दिली. जगातील पहिली महापालिका आहे 3 हजार कोटी रुपयांची औषधे फ्री देणार आहे. मला काय मिळतं यापेक्षा लोकांना काय मिळतंय हे बघा, असं आवाहनही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलं.
महिला सक्षमीकरणासाठी 250 कोटी रुपयांची तरतूद
जगातील नंबर वन महापालिका मुंबई मनपा झाली पाहिजे असं काम करुयात. महिला सक्षमीकरणासाठी 250 कोटी रुपयांची तरतूद केलीये. देशातील आपले पहिले राज्य आहे जिथे 8 लाख कोटी रुपयांची कामे सुरु आहेत. कनेक्टीव्हिटीमुळे लोकांचा वेळ इंधन आणि बरच काही वाचेल. लोकांचा जास्त वेळ प्रवाशात जातो . मी राजकीय बोलणार नाही. कारण लोकांच्या पोटात दुखते, असंही शिंदे (Eknath Shinde) यांनी स्पष्ट केलं.
इतर महत्वाच्या बातम्या