एक्स्प्लोर
पी. चिदंबरम यांच्या मुलाची ईडीकडून तब्बल 11 तास चौकशी
आयएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात कार्ती यांच्या भूमिकेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. आर्थिक गैरव्यवहार विरोधी कायद्याअंतर्गत कार्ती यांची जबाब नोंदवला गेला, अशी माहिती सूत्रांनी दिली.
![पी. चिदंबरम यांच्या मुलाची ईडीकडून तब्बल 11 तास चौकशी ED interrogated Karti for 11 hours latest updates पी. चिदंबरम यांच्या मुलाची ईडीकडून तब्बल 11 तास चौकशी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/01/19132324/kARTI.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम हे आयएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात चौकशीसाठी ईडीसमोर हजर राहिले आणि कार्ती यांची जवळपास 11 तास चौकशी झाली. ईडीने कार्ती यांनी या प्रकरणात चौकशी अधिकाऱ्यांसमोर (आयओ) हजर राहण्यासाठी समन्स पाठवलं होतं.
आयएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात कार्ती यांच्या भूमिकेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंध कायद्याअंतर्गत कार्ती यांचा जबाब नोंदवला गेला, अशी माहिती सूत्रांनी दिली.
“जे मी याआधीही कोर्टात याचिकांना उत्तर देताना म्हटले, तेच आताही चौकशीत सांगितले. काही प्रश्न टाईप केले असल्याने त्यात वेळ गेला.”, असे कार्ती यांनी सांगितले. विशेष म्हणजे, याआधीही दोनवेळा कार्तींच्या अधिकृत प्रतिनिधींनी चौकशी अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. त्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणेने कार्तींना प्रत्यक्ष हजर राहण्यास सांगितले होते.
तपास यंत्रणेने गेल्या वर्षी मे महिन्यात कार्ती आणि आणखी काही आरोपींविरोधात तक्रार दाखल केली होती. यंत्रणेने सीबीआयच्या तक्रारीनंतर आरोपींविरोधात ईसीआयआर दाखल केली. मग ईडीची ईसीआयआर ही पोलिसांच्या प्राथमिक तक्रारीसारखी असते.
ईडीच्या ईसीआयरमध्ये कार्ती, आयएनएक्स मीडिया आणि संचालक पीटर, इंद्राणी मुखर्जींचा समावेश आहे. सीबीआयच्या तक्रारीमध्येही या आरोपींच्या नावांचा समावेश आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंध कायद्यानुसार (पीएमएमलए) ईसीआय़आर दाखल केली गेली होती.
याआधीही सीबीआयने चौकशीअंतर्गत चार शहरांमध्ये कार्ती यांच्या घर आणि कार्यालयांची चौकशी केली होती.
करातून वाचण्यासाठी कार्ती यांनी पीटर आणि इंद्राणी मुखर्जी यांच्या हक्काच्या एका मीडिया कंपनीकडून पैसे घेतले होते, असा आरोप कार्ती यांच्यावर आहे. कार्ती हे त्यांच्यावरील सर्व आरोपांचे खंडन करतात.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
क्रीडा
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)