एक्स्प्लोर
Advertisement
डोंबिवलीत मॅनहोलमध्ये गुदमरुन तीन सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू
पहिला कर्मचारी गुदमरल्याने त्याला वाचवण्यासाठी दुसरा कामगार आत गेला, मात्र हे दोघंही आत अडकून पडल्याने त्यांना वाचण्यासाठी तिसरा कामगार आत गेला.
डोंबिवली : मॅनहोलमध्ये गुदमरुन तीन सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत घडली आहे. एका कर्मचाऱ्याला वाचवताना तिघांनाही प्राण गमवावे लागले
खंबाळपाडा एमआयडीसी परिसरात रासायनिक सांडपाणी वाहून नेणाऱ्या मॅनहोलची सफाई करण्यासाठी हे तिघं आले होते. यावेळी त्यांच्यापैकी एक जण आतमध्ये उतरला, मात्र तो गुदमरल्याने त्याला वाचवण्यासाठी दुसरा कामगार आत गेला, मात्र हे दोघंही आत अडकून पडल्यानं त्यांना वाचण्यासाठी तिसरा कामगार आत गेला आणि या तिघांचाही गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला.
देविदास पाजगे, महादेव झोपे आणि चंद्रभान अशी या तीन मृत कामगारांची नावं आहेत. हे तिघे ज्यावेळी मॅनहोलच्या सफाईसाठी आत उतरले, त्यावेळी मास्क, सेफ्टी बेल्ट अशा कुठल्याही प्रकारच्या सुरक्षात्मक उपयोजना करण्यात आल्या नसल्याची बाब समोर आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement