एक्स्प्लोर
Dombivali Pollution | एकतर सुरक्षा उपकरणे लावा नाहीतर केमिकल कंपन्यांना टाळे ठोका, मुख्यमंत्री ठाकरेंचा इशारा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डोबिंवलीतील प्रदूषणाची पाहणी केली असून त्यांच्यासोबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रदूषणाबाबत संताप व्यक्त केला.
मुंबई : केमिकल कंपन्यांच्या प्रदूषणाने नागरिक हैराण झाले असून या कंपन्यांनी एकतर सुरक्षा उपकरणे लावा नाहीतर मग टाळे ठोका असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केमिकल कंपन्यांना आज दिला. डोंबिवलीमध्ये रासायनिक प्रदूषणामुळे झालेल्या गुलाबी रस्त्याची पाहणी करून झाल्यावर केडीएमसीमध्ये सर्व संबंधित शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी कंपन्यांना इशारा दिला आहे. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, डोंबिवली एमआयडीसीतील रासायनिक प्रदूषणाबाबत 3 टप्प्यात कार्यवाही आणि कारवाई केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात शासनाच्या यंत्रणा कारखान्यांची तपासणी करून जी सुरक्षा उपकरणे लावण्यास सांगतील ती संबंधित कंपन्यांनी लावावी. ही उपकरणे लावायची की कंपनीला कुलूप लावायचे हा निर्णय कंपनी मालकांनी घ्यावा असे आदेश दिल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
तर दुसऱ्या टप्प्यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे घातक केमिकल वाहून जाण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभी करणे आणि तिसऱ्या टप्प्यात घातक केमिकल कंपन्या नागरी वस्तीच्या बाहेर हलवण्यात येणार आहेत. त्यासाठी आपण 15 दिवसांची मुदत दिली असून त्या कंपन्या कोणत्या? त्यांना कुठे जागा द्यायची? कोणाला कुठे हलवायचं याबाबतही आवश्यकतेनुसार निर्णय घेतले जाणार असल्याचे ते म्हणाले.
डोंबिवलीच्या प्रदूषणाची उद्धव ठाकरेंकडून पाहणी; मुख्यमंत्री येण्याआधी गुलाबी रस्त्यांची साफसफाई
यावेळी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने प्राधान्याने महापालिकेच्या प्रकल्पांबाबत अहवाल सादर केल्यास त्यांना 100 कोटी निधी स्वरुपात दिले जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले. त्याचप्रमाणे यापुढेही महापालिकेच्या अहवाल सादरीकरणानंतर शहरासाठी आवश्यक त्या परवानग्या व निधी दिला जाईल असेही आश्वासन मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले. महापालिकेने शहर स्वच्छता, वाहतूक बेटे, रस्त्यांचे कॉक्रिटीकरण न करता रस्ते मिलींग अॅण्ड फिनीशिंग पध्दतीने बनविणे, दुभाजकांची व्यवस्था करणे, फेरीवाला हटाव मोहिम राबविणे, रस्त्यावरील बेवारस वाहने हालविणेबाबत तातडीने कार्यवाही करावी, याबाबतचे निर्देश त्यांनी महापालिकाआयुक्त गोविंद बोडके यांना दिले.
डोंबिवलीतील प्रदूषण आणि त्यामुळे गुलाबी झालेल्या रस्त्यांची बातमी माझानं बातमी दाखवल्यानंतर या परिस्थितीची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली. त्यांनी आज (गुरूवारी) डोंबिवलीतील परिस्थितीची पाहणी केली. मुख्यमंत्री स्वतः पाहणी करण्यासाठी येणार म्हटल्यावर प्रशासन खडबडून जागं झालं आणि त्यांनी प्रदूषणामुळे गुलाबी झालेले रस्ते स्वच्छ करण्यासाठी सुरुवात केली. गटारातील गुलाबी पाणीदेखील पंप लावून उपसण्याचा प्रयत्न करण्यासाठी सुरुवात झाली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्रिकेट
शेत-शिवार
राजकारण
Advertisement