(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मोठी बातमी! धनगर आरक्षणाबाबत आजपासून हायकोर्टात अंतिम सुनावणी
Dhangar Reservation : राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करावे या मागणीसाठी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली आहे.
मुंबई : धनगर आरक्षणाबाबत (Dhangar Reservation) आजपासून हायकोर्टात सुनावणी होणार आहे. राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करावे या मागणीसाठी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. त्याच याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात आजपासून (3 जानेवारी) अंतिम सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. तर, धनगर समाजाला आरक्षण मिळेल आणि निकाल आमच्याच बाजूने लागेल असा विश्वास भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला.
शासन दरबारी धनगड अशी नोंद असून, राज्यातील धनगर हे धनगड नसून धनगर आहेत. त्यामुळे धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करावे या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यावर आजपासून अंतिम सुनावणी होणार आहे. त्यामुळे ही सुनावणी महत्वाची समजली जात आहे. सध्या राज्यातील धनगर समाजाला ओबीसीचे राजकीय आरक्षण असून, धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे म्हणजेच एसटीचे आरक्षण देण्याची मागणी होत आहे.
अनेक राज्यात धनगर समाजाला ST आरक्षण
राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करून एसटीचे आरक्षण देण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जाता असून, यासाठी धनगर समाज लढा देत आहे. सध्या राज्यातील धनगर समाजाला ओबीसीचे राजकीय आरक्षण असले तरीही देशातील अनेक राज्यात मात्र धनगर समाजाला एसटीचे आरक्षण आहे. राज्यातील धनगड आणि धनगर या शब्दामुळे आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असल्याचे बोलले जाते. राज्यातील धनगर समाजी शासकीय दरबारी धनगड नोंद असल्याने त्यांना धनगर समाजाचे आरक्षण मिळत नसल्याचे बोलले जाते. त्यामुळे इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रातील धनगर समाजाला देखील अनुसूचित जमातीचे म्हणजेच एसटीचे आरक्षण देण्याची मागणी अनेक वर्षांपासून राज्यातील धनगर समाज करत आहेत. दरम्यान आता हे प्रकरण न्यायालयात जाऊन पोहचले असून, या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. याच याचिकेवर आजपासून अंतिम सुनावणी होणार असून, याकडे राज्यातील धनगर समाजाचे लक्ष लागले आहेत.
राज्यभरात आंदोलनं...
राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करून एसटीचे आरक्षण देण्याच्या मागणीसाठी राज्यातील अनेक भागात आंदोलनं करण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. सोबतच, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून देखील मागील काही वर्षांपासून लढा दिला जात आहे. यासाठी स्वतः पडळकर यांनी देखील अनेकदा आंदोलन केले आहेत. त्यामुळे आजपासून सुरु झालेल्या सुनावणीनंतर न्यायालय काय निर्णय देणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: