मुंबईत टेस्ला दाखल, आता EV क्रांतीला वेग येणार, महाराष्ट्राची पॉलिसी सर्वात उत्तम, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Devendra Fadnavis:आमच्याकडे आता भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात इलेक्ट्रिक मोबिलिटीसाठी खूप मोठी आणि मजबूत बाजारपेठ आहे, आम्ही आता इलेक्ट्रिक मोबिलिटीचे उत्पादन केंद्र देखील आहोत असेही ते म्हणाले.

Mumbai: EV च्या जगातली आघाडीच्या टेस्ला कंपनीने अखेर भारतात आपली स्मार्ट कार लाँच केलीय. टेस्लाने आपलं लोकप्रीय Y मॉडल मुंबईतील बीकेसी येथे पहिले एक्स्पेरियन्स सेंटर सुरु केले आहे. (Tesla Y Model LR RWD Car) या सेंटरचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी उद्घाटन केले. यावेळी टेस्ला मुंबईतून भारतभर येणार ही अतिशय आनंदाची बाब असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
'टेस्लाचं संपूर्ण मेकॅनिझम आणि सर्विसिंग सेंटर ते मुंबईमध्ये उघडतायत. टेस्लाचं बुकिंग हे या सेंटरपासून सुरु करणार आहेत. महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी ही आनंदाची गोष्ट आहे. ज्याची आपण वाट बघत होतो ती टेस्ला मुंबईपासून देशभरात लाँच होतेय. याचं शंभर टक्के उपयोगिता पुढच्या काळात होईल. महाराष्ट्राने EV साठी जी पॉलिसी तयार केली आहे ज्यात चार्जिंग व्यवस्थेसह गाडीवरच्या करापर्यंत, वाहने तयार करण्यासाठी वेगवेगळी सूट आपण दिली आहे.त्यामुळे आज महाराष्ट्रात EV साठी आवडतं केंद्र झालंय. लवकरच देशातली सर्वात मोठी क्षमता असणारं केंद्र भारतात तयार होईल' असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. टेस्लाचं आम्ही स्वागत केलंय. त्यांनीही सांगितलंय की सुरुवात मुंबईपासून केलं आहे. अजून दोन ठिकाणच्या नोंदण्या ते मुंबईपासून सुरु करणार आहेत. मुंबईत ते चार मोठे चार्जिंग स्टेशन आणि ३२ चार्जिंग इंफ्रास्टक्चर तयार करतील. यात केवळ पंधरा मिनिटांमध्ये चार्जिंग आणि 600 किमी चालणारी ही गाडी आहे. टेस्लाचा जगभरात एकही अपघात नाही असा रेकॉर्ड आहे. जगातलं सर्वात लोकप्रिय y मॉडेल आहे.हे मॉडेल त्यांनी लाँच केल्याचंही ते म्हणाले.
"टेस्ला ही केवळ एक कार किंवा कार कंपनी नाही, तर ती डिझाइन, नावीन्य आणि शाश्वततेबद्दल आहे, ज्यासाठी टेस्ला एक उदाहरण आहे. मला वाटते की जागतिक स्तरावर तिची लोकप्रियता असण्याचं हेच एकमेव कारण आहे," असे ते म्हणाले. त्यांनी महाराष्ट्र आणि संपूर्ण भारतात इलेक्ट्रिक वाहनांच्या वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठेकडे लक्ष वेधले. "आमच्याकडे आता भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात इलेक्ट्रिक मोबिलिटीसाठी खूप मोठी आणि मजबूत बाजारपेठ आहे, आम्ही आता इलेक्ट्रिक मोबिलिटीचे उत्पादन केंद्र देखील आहोत, परंतु मला वाटते की टेस्ला संपूर्ण बाजारपेठ बदलणार आहे," असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्राची EV पॉलिसी सर्वात उत्तम
महाराष्ट्राची इव्ही पॉलिसी भारतातील सर्वात उत्तम पॉलिसींमध्ये आहे. केवळ टेस्लासाठीच नाही तर ज्यांना ज्यांना इव्ही मोटार आणि या क्षेत्रात काम करायचं आहे. त्या सर्वांसाठी ही पॉलिसी आम्ही तयार केली आहे. सर्वांसाठी प्रेरणा देणारी ही पॉलिसी असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
टेस्लच्या इलेक्ट्रीक कारची वैशिष्ट्ये काय?
* टेस्ला कंपनीची 3 RWD या मॉडेलची कार अवघ्या 5.6 सेकंदात शून्य ते 100 इतका वेग गाठू शकते.
* Tesla 3 LR RWD ही कार एकदा चार्ज केल्यानंतर 622 किलोमीटर अंतरापर्यंत प्रवास करु शकते.
* टेस्लाची स्टँटर्ड RWD व्हर्जनची कार एकदा चार्ज केल्यानंतर 500 किलोमीटर अंतरापर्यंत प्रवास करु शकते.
* नवीन Model Y मध्ये बाह्य व आतील रचनेत बदल करण्यात आले असून, आता मागील सीटसाठी स्वतंत्र टचस्क्रीन आणि इलेक्ट्रिक अॅडजस्टेबल फंक्शनदेखील देण्यात आले आहेत.
* Model Y ही टेस्लाची सर्वाधिक विक्री होणारी कार आहे आणि जगभरातही ती सर्वोच्च विक्री होणाऱ्या कार्सपैकी एक आहे.
* Model Y ची स्पर्धा BMW X1 LWB, Volvo C40, BYD Sealion 7, आणि Mercedes-Benz EQA यांच्याशी होणार आहे. भारतात ही कार पूर्णपणे आयात (CBU) करून आणली जात असल्यामुळे किंमतीत वाढ झालेली आहे.
टेस्लाच्या कोणत्या रंगासाठी किती जास्तीचे पैसे मोजावे लागणार?
टेस्लाच्या Model Y च्या RWD व्हर्जनची किंमत ₹61.07 लाख असून, LR RWD व्हर्जनसाठी ही किंमत ₹69.15 लाख इतकी आहे. यानंतर आपल्या आवडीचा रंग हवा असल्यास त्यासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागतील.
स्टेल्थ ग्रे
पर्ल व्हाइट मल्टी-कोट (₹95,000 अतिरिक्त)
डायमंड ब्लॅक (₹95,000 अतिरिक्त)
ग्लेशियर ब्लू (₹1,25,000 अतिरिक्त)
क्विक सिल्व्हर (₹1,85,000 अतिरिक्त)
अल्ट्रा रेड (₹1,85,000 अतिरिक्त)
हेही वाचा:
























